शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गैरहजर राहणाऱ्या ग्रामसेवकाची टेबल खुर्ची जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:25 IST

अतिदुर्गम नक्षलग्रस्त क्षेत्र असलेल्या म्हैसुली/बोंडे या ग्रामपंचायतमध्ये कार्यरत ग्रामसेवक एस.एस.सीरसाम ग्रामसभेच्या व इतर दिवशी गैरहजर राहत असल्याने गावातील विकास कामे खोळंबली होती.

ठळक मुद्देम्हैसुली ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा आक्रमक पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : अतिदुर्गम नक्षलग्रस्त क्षेत्र असलेल्या म्हैसुली/बोंडे या ग्रामपंचायतमध्ये कार्यरत ग्रामसेवक एस.एस.सीरसाम ग्रामसभेच्या व इतर दिवशी गैरहजर राहत असल्याने गावातील विकास कामे खोळंबली होती. दरम्यान या प्रकारामुळे संतापलेल्या सरपंच व पदाधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाची खुर्ची व टेबल जप्त करुन खंडविकास अधिकाऱ्याकडे जमा केली. दरम्यान ग्रामसेवकाला धडा शिकविण्यासाठी प्रथमच अशी कारवाई करण्यात आली.आदिवासी बहुल व दुर्गम भागात काम करण्यास बरेच कर्मचारी उत्सुक नाहीत. त्यामुळे काही कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी रुजू होत नाही. तर काही रूजू झाले तर सतत अनुउपस्थित राहतात. त्याचा फटका गावकऱ्यांना सहन करावा लागतो. गावाच्या विकासात ग्रामपंचायतची भूमिका महत्त्वपूर्ण असून ग्रामसेवक हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र देवरी तालुक्यातील म्हैसुली येथील ग्रामसेवक सातत्याने अनुउपस्थित राहत असल्याने गावकऱ्यांची कामे खोळंबली होती. शिवाय गावातील विकास कामांवर सुध्दा परिणाम होत होता. सरपंच व पदाधिकाऱ्यांनी याबाबत वांरवांर सूचना देऊन सुध्दा ग्रामसेवकाने याकडे दुर्लक्ष केले होते. शेवटी संतापलेल्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी ग्रामसेवकाची टेबल खुर्ची जप्त करून चक्क खंडविकास अधिकाºयांकडे जमा केली. दरम्यान या प्रकाराने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ग्रामसेवक सीरसाम यांच्यावर कारवाई करुन दुसऱ्या ग्रामसेवकाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. प्राप्त माहितीनुसार पदाधिकाऱ्यांनी १३ मार्च रोजी दुरध्वनीद्वारे ग्रामसेवकाशी संपर्क साधला असता त्यांनी १४ मार्च रोजी ग्रामपंचायत येणार असे सरपंच व उपसरपंचास सांगितले. परंतु १४ रोजी बुधवारला दिवसभर वाट पाहून ग्रामसेवक न आल्याने संतप्त पदाधिकाऱ्यांनी त्यांची खुर्ची टेबल जप्त करुन देवरी पं.स.गाठले व तिथे खंड विकास अधिकारी मनोज हिरुडकर यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.वरिष्ठांच्या कारवाईकडे लक्षविशेष म्हणजे ग्रामसेवकाची टेबल खुर्ची जप्त करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. आता वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे म्हैसुली ग्रा.पं.चे लक्ष लागलेले आहे. भर्रेगाव ग्रामपंचायतचा कार्यभार याच ग्रामसेवकाकडे असून याबद्दल भर्रेगाव येथील उपसरपंच मनोज मिरी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की भर्रेगाव ग्रामपंचायतमध्ये सुद्धा ग्रामसेवक हजर राहत नसल्याचे सांगितले.ग्रामसेवकाची तक्रारग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी खंडविकास अधिकाऱ्यांना केलेल्या तक्रारीत म्हैसुली येथे २९ जानेवारी २०१८ रोजी ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत ग्रामस्थांच्या विविध समस्या विषयी विनंती अर्ज व गावातील विकासात्मक कामाविषयी ठराव लिहिणे बाकी आहे. त्याचप्रमाणे ग्रामसेवक एस.एस.सीरसाम यांच्याकडे ग्रामपंचायत भर्रेगावचा कार्यभार आहे. म्हैसुली बोंडे ग्रा.पं. करिता सोमवार, बुधवार व शुक्रवार हे दिवस ठरविलेले आहेत. परंतु ग्रामसेवक या दिवशी सुद्धा गैरहजर राहत असल्याने गावकऱ्यांना लागणारे दस्ताऐवज मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. नियोजनबद्ध मासिक सभा ठरविणे, विशेष सभा घेण्याकरिता नियोजनात्मक संकल्पना करण्याकरिता ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहणे गरजेचे आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत