शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मानव विकासच्या बसेसपासून वंचित

By admin | Updated: January 13, 2015 23:02 IST

कोणत्याही गावातील विद्यार्थीनींना शाळेत पायी जावे लागू नये, विद्यार्थीनीची शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांची उपस्थिती वाढावी यासाठी शासनाने इयत्ता पाचवी ते सातवीपर्यतच्या

केशोरी : कोणत्याही गावातील विद्यार्थीनींना शाळेत पायी जावे लागू नये, विद्यार्थीनीची शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांची उपस्थिती वाढावी यासाठी शासनाने इयत्ता पाचवी ते सातवीपर्यतच्या विद्यार्थीनीसाठी बसेसची सेवा उपलब्ध केली. परंतु केशोरी परिसरातील दिनकरनगर, प्रतापगड, गोठणगाव, चिचोली, वडेगाव (बंध्या), परसटोला, बोंडगाव (सुरबन), पुष्पनगर अ, पुष्पनगर ब या गावासाठी साकोली आगार प्रमुखानी बसफेरी सुरू न केल्यामुळे येथील २४५ शालेय विद्यार्थीनींना अजूनही पायी चालत शाळेत यावे लागते. अहिल्याबाई होळकर बस पास सवलत आणि इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थीनीसाठी मानव विकासअंतर्गत बस पास सवलतीअंतर्गत बसफेरी सुरू केली आहे. परंतु केशोरी येथील विविध शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीसाठी मानव विकास अंतर्गत बसफेरी सुरू करण्याच्या संदर्भात सबंधीत शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रयत्न केले. साकोली आगार प्रमुख केशोरी परिसरातील विद्यार्थीनीसाठी बसफेरी सुरू करण्यास असमर्थ ठरले. या मागणीसंबधी मुख्याध्यापकांनी जिल्हाधिकाऱ्यंना विनंती करून मानव विकास बसफेरी सुरू करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी गोंदिया यांनी त्याचे पत्र क्र. जिकाना/संकीर्ण/६१०/२०१४ दि. ४.०९.२०१४ अन्वये साकोली आगर प्रमुखांच्या नावे पत्र देऊन मानव विकास अंतर्गत बसफेरी सुरू करण्याचे आदेश देऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागीतला.परंतु चक्क साकोली आगार प्रमुखांनी सदर पत्रावर कोणतीही कार्यवाही न करता जिल्हाधिकाऱ्यांच्या पात्राला केराची टोपली दाखविली आहे. वास्तविक मानव विकासअंतर्गत सुरू असलेल्या बसफेऱ्यांचे नियोजन करण्याचे अधिकार सबंधित आगार प्रमुखांना देण्यात आली आहेत.परंतु म.रा. परिवहन मंडळातील अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी केशोरी परिसरातील २४५ शालेय विद्यार्थीनी अजून शाळा-महाविद्यालयात पायदळ येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)