शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोनसची रक्कम त्वरित जमा करा, अन्यथा तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:30 IST

गोंदिया : मागील खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने प्रतिक्विंटल ७०० रुपये ...

गोंदिया : मागील खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने प्रतिक्विंटल ७०० रुपये बाेनस देण्याची घोषणा केली, मात्र बोनसची पूर्ण रक्कम न देता केवळ ५० टक्के रक्कम दिली आहे. त्यामुळे उर्वरित ५० टक्के बोनसची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे यांनी दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळे शासकीय धान खरेदीचा पूर्णपणे बोजवारा उडाला. रब्बीतील धान खरेदी खरीप हंगामातसुद्धा ठेवण्याची वेळ शासनावर आली तर यानंतरही धान खरेदीचे नियोजन नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने धानाची विक्री करावी लागली. खरिपातील बोनसची रक्कम व रब्बीतील धानाचे चुकारे अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सध्या खरीप हंगामातील रोवणीची कामे सुरू असून, त्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. मात्र अद्यापही बोनसची रक्कम आणि धानाचे चुकारे न मिळाल्याने शेतकऱ्यांना उधार, उसनवारी करण्याची व सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली. याला महाविकास आघाडी सरकारचे धोरण जबाबदार आहे. येत्या आठ दिवसांत बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा न केल्यास याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे यांनी दिला आहे.