शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
3
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
4
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
5
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
6
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
7
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
8
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
9
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
10
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
11
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
12
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
13
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
14
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
15
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
16
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
17
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
18
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
19
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
20
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

५१५ आवासांचा अहवाल केंद्राकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 11:51 PM

पंतप्रधान शहरी आवास योजनेंतर्गत राज्यस्तरीय मुल्यमापन समितीने ५१५ आवासांच्या सविस्तर प्रकल्प अहवालास (डिपीआर) मंजुरी दिली आहे. त्यातच आता गृह निर्माण विभागाच्या मुख्य सचिवांनीही या अहवालास मंजुरी दिली असल्याने राज्य शासनाची मंजुरी झाली असून अहवाल अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

ठळक मुद्देमुख्य सचिवांनी दिली मंजुरी : आता अंतिम मंजुरीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान शहरी आवास योजनेंतर्गत राज्यस्तरीय मुल्यमापन समितीने ५१५ आवासांच्या सविस्तर प्रकल्प अहवालास (डिपीआर) मंजुरी दिली आहे. त्यातच आता गृह निर्माण विभागाच्या मुख्य सचिवांनीही या अहवालास मंजुरी दिली असल्याने राज्य शासनाची मंजुरी झाली असून अहवाल अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. आता केंद्राची मंजुरी मिळाल्यास शहरात ५१५ आवासांच्या निर्माणाचा मार्ग मोकळा होणार आहे.आपले हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा राहत असून यासाठी कित्येकाकडून आपल्या पोटाला चिमटा देऊन ‘पै-पै’ जोडली जाते. जोडलेला पैसा कमी पडल्यास उधार, उसणवारी किंवा बँकेक डून कर्ज घेऊन चार भिंती व छतासाठी सर्वांचीच धडपड सुरू असते. यात कित्येकांची स्वप्नपुर्ती होते, तर कित्येकांना मात्र भाडयाच्या घरातच तर त्याही पेक्षा हलाखीची स्थिती असलेल्यांना झोपडपट्टीतच आपले जीवन वाहून घ्यावे लागते. यामुळेच देशाच्या स्वांतत्र्याच्या ७५ व्या वर्षापर्यंत सर्वांना हक्काचे घर मिळावे या दृष्टीकोनातून गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाकडून ‘पंतप्रधान शहरी आवास योजना’ राबविली जात आहे.चार विविध घटकांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या योजनेंतर्गत नगर परिषदेकडे चार हजार ६६७ नागरिकांचे अर्ज आले आहेत.विविध स्थितींत समाविष्ट असलेल्या नागरिकांना त्यांच्या सुविधेनुसार सामावून घेण्यासाठी हे चार घटक पाडण्यात आले आहेत. यातील चौथ्या क्रमांकाच्या ‘आर्थिक दुर्बल घटक’ यामध्ये नगर परिषदेकडे १७६७ अर्ज आले आहेत. यातील ५१५ आवासांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) नगर परिषदेने म्हाडाकडे पाठविला होता. या प्रस्तावातील त्रुट्यांची दुरूस्ती व पाठपुरावा केल्यानंतर म्हाडाकडून तसा अहवाल मंत्रालयातील गृह निर्माण विभागाकडे पाठविण्यात आला. विशेष म्हणजे, विभागातील राज्यस्तरीय मुल्यमापन समितीकडे हा अहवाल गेल्यावर १५ जून रोजी मुंबईत समितीची बैठक घेण्यात आली व या बैठकीत या ५१५ आवासांच्या अहवालास समितीने मंजुरी दिली. त्यानंतर आता २१ जून रोजी झालेल्या बैठकीत गृह निर्माण विभागाच्या मुख्य सचिवांनीही मंजुरी दिल्याने राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे.त्यामुळे आता हा अहवाल अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. केंद्राची मंजुरी मिळाल्यावर शहरातील ५१५ लाभार्थ्यांचे त्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न फलितास येणार आहे.शहरात होणार योजनेचा श्रीगणेशकेंद्र शासनाची मंजुरी मिळाल्यास ५१५ आवासाचा मार्ग मोकळा होणार असून या माध्यमातून शहरात पंतप्रधान आवास योजनेचा श्रीगणेश करता येणार आहे. योजनेतंर्गत घटक- चार ‘आर्थिक दुर्बल घटक’ अंतर्गत हे आवास तयार होतील. या घटकात ज्यांच्याकडे स्वत:ची जागा आहे, मात्र घर नाही त्यांचा समावेश होतो. या घटकात केंद्र शासनाकडून १.५० लाख तर राज्य शासनाकडून १ लाख रूपयांचे अनुदान घर बांधकामासाठी दिले जाते. नगर परिषदेच्या संबंधीत विभागाच्या नियंत्रणात संबंधीत लाभार्थ्याला घराचे बांधकाम करावे लागणार आहे. 

टॅग्स :government schemeसरकारी योजना