शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया बिडीओंवर विभागीय चौकशीचा बडगा

By admin | Updated: July 4, 2016 01:28 IST

माहिती अधिकाराअंतर्गत गोंदिया तालुक्यात मानव विकास योजनेअंतर्गत शाळांसाठी चालणाऱ्या स्कूल बसेसबाबत कोणतीच माहिती न देणारे...

१० हजारांचा दंड : माहिती न पुरविणे भोवलेगोंदिया : माहिती अधिकाराअंतर्गत गोंदिया तालुक्यात मानव विकास योजनेअंतर्गत शाळांसाठी चालणाऱ्या स्कूल बसेसबाबत कोणतीच माहिती न देणारे आणि माहिती आयोगापुढे आपली बाजू मांडण्यासाठी अनुपस्थित राहणारे गोंदियाचे बीडीओ वालकर यांना नागपूर खंडपिठाचे राज्य माहिती आयुक्त वसंत पाटील यांनी १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. एवढेच नाही तर त्यांची विभागीय चौकशी का करण्यात येऊ नये, अशी नोटीस पाठविण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले.देवरीतील सामाजिक कार्यकर्ते नरेशकुमार जैन यांच्या अपिलावरून ही कारवाई करण्यात आली. जैन यांनी २०१५-१६ च्या मानव विकास योजनेअंतर्गत गोंदिया तालुक्यात चालणाऱ्या सातही बसेसची गाव व शाळानिहाय वाहतुकीची माहिती १२ आॅक्टोबर २०१५ रोजी गोंदिया पं.स.च्या जनमाहिती अधिकाऱ्यांकडे माहितीच्या अधिकारांतर्गत मागितली होती. परंतू त्यांच्याकडून कोणतीच माहिती न मिळाल्यामुळे जैन यांनी राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपिठाकडे अपिल केले. त्यावर १२ मार्च २०१६ रोजी सुनावणी घेण्यात आली. परंतू प्रथम अपिलीय अधिकारी असलेले बीडीओ वालकर आयोगापुढे हजर झालेच नाही. त्यांनी यासंदर्भातील सुनावणीसाठी आपले प्रतिनिधी म्हणून सहायक प्रशासन अधिकारी आर.एस.कोचे यांना पाठविले. त्यामुळे आयोगाने २० वेळा नाराजी व्यक्त केली. गोंदिया पंचायत समिती कार्यालयाकडून माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कायद्याचे अनुपालन होत नसून अपिलार्थी जैन यांना न्याय मिळत नसल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले.याप्रकरणी आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागल्याचे अपिलार्थी नरेशकुमार जैन यांनी आयोगासमक्ष सांगितले. त्यामुळे गटविकास अधिकारी वालकर यांना माहितीच्या अधिकारातील कलम १९ (८) (ख) अन्वये १० हजार रुपये धनादेशाद्वारे जैन यांना अदा करावे असा आदेश दिला. तसेच वालकर यांची विभागीय चौकशी का करण्यात येऊ नये? याचा खुलासा विभागीय आयुक्त, महसूल नागपूर यांनी मागवून आयोगास सादर करण्याचा आदेश दिला.एवढेच नाही तर वालकर यांनी सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या १० जून २००८ च्या परिपत्रक व कलम १९ (८) (ग) व २० (२) अन्वये शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस का करू नये? याचा खुलासा आयोगासमोर स्वत: उपस्थित राहून करावा, असा आदेश २७ जून रोजी दिला. (जिल्हा प्रतिनिधी)पुढच्यास ठेच, मागचा शहाणाएखाद्या अधिकाऱ्याने माहितीच्या अधिकाराची अवहेलना केल्याने त्यांना दंड होण्याचा आणि विभागीय चौकशीसाठी कारणे दाखवा नोटीस देण्याचा हा गोंदिया जिल्ह्यातील पहिलाच निकाल आहे. त्यामुळे माहिती अधिकारास टाळटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना या निर्णयामुळे चांगलाच झटका बसणार आहे. यापुढे टाळाटाळ करणाऱ्या किंवा चुकीची माहिती देणारे जनमाहिती अधिकारी वेळीच सावरतील.