शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कार्यालयाला पाटबंधारे विभागाचे कुलूप

By admin | Updated: August 17, 2015 01:45 IST

सिहोरा स्थित असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या रिकाम्या वसाहतीत मंडळ कृषी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असले तरी, या वसाहतीला पाटबंधारे विभागाने कुलूप ठोकले आहे.

कार्यालयाचे स्थानांतरण वांद्यात : कागदी घोड्यांची लालफीतशाही लोकमत विशेषरंजित चिंचखेडे चुल्हाडसिहोरा स्थित असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या रिकाम्या वसाहतीत मंडळ कृषी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असले तरी, या वसाहतीला पाटबंधारे विभागाने कुलूप ठोकले आहे. यामुळे आठवडाभरापासून कार्यालयाचे स्थानांतरण अडले असून चर्चेला उधाण आले आहे.सिहोरा येथे चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करणाऱ्या पाटबंधारे विभागाची वसाहत आहे. या वसाहतीत चार ते पाच खोल्या रिकाम्या असून कुणी कर्मचारी वास्तव्य करीत नाहीत. यामुळे या खोल्या उपयोगाविना पडून आहेत. या खोल्यांची डागडुजी करण्यात आली नसल्याने दुर्लक्षित झाली आहेत. वसाहतीत वास्तव्य करणारे कर्मचारी या विभागात नाहीत. तीन कर्मचाऱ्यांवर या विभागाचा डोलारा सुरू आहे. हे तिन्ही कर्मचारी मार्च २०१६ पर्यंत सेवानिवृत्त होणार आहेत. यामुळे या विभागाचे नंतरचे भवितव्य सांगता येत नाही. दरम्यान उपयोगिताविना पडून असलेली वसाहत शेतकरी व जनतेच्या उपयोगात आणण्याची ओरड परिसरात सुरू झाली. सिहोऱ्यात असणारा मंडळ कृषी कार्यालय जागेअभावी हरदोली गावात स्थानांतरित करण्यात आले आहे. सिहोरा या प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या गावात शेतकरी व जनतेच्या हिताची संपूर्ण कार्यालय असताना मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण खटकणारे ठरले. यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे कार्यालय पाटबंधारे विभागाच्या रिकाम्या वसाहतीत स्थानांतरीत करण्याची ओरड सुरू केली. यामुळे शेतकऱ्यांची ८ कि़मी. अंतरची पायपीट थांबणार होती. शेतकऱ्यांचे हिताचा निर्णय असून प्रशासकीय कारभार करण्यात येणारी इमारत जीर्ण झाल्याने कृषी विभागाने मंडळ अधिकारी कार्यालय सिहोऱ्यात स्थानांतरणाला हिरवी झेंडी दिली. त्याप्रमाणे पाटबंधारे विभागाच्या वसाहतीत एका खोलीला कृषी विभागाने रंगरंगोटी केली. या खोल्याची चाबी किल्ली कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. कार्यालय स्थानांतरणाची चर्चा गेल्या आठ महिन्यांपासून होती. या वसाहतीत ८ आॅगस्टला आ. चरण वाघमारे यांचे हस्ते मंडळ कृषी कार्यालयाचे उद्घाटन झाले. गावागावात कार्यालय स्थानांतरण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.यानंतर लगेच सायंकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आल्याचे सांगत पाटबंधारे विभागाचे कार्यरत कर्मचाऱ्यांनी कुलूप ठोकले. वरिष्ठांचे आदेशाचे पालन करण्यात येत असल्याची माहिती कार्यरत कर्मचाऱ्यांनी दिली. या वसाहतीचे मुल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत केले जाणार आहे. या मुल्यांकनानुसार भाडे निश्चित करण्यात येणार असून करारबद्ध करण्याची प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे. यामुळे गेल्या आठवडाभरा पासून मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण कागदी घोड्यांच्या लालफीतशाहीत अडले आहे. कागदी घोड्यांची प्रक्रिया यंत्रणेत लांबणीवर जात असल्याने कार्यालयाचे स्थत्तनांतरण वांद्यात आले आहे. मंडळ कृषी कार्यालयाने अशा प्रक्रियांना सुरूवात केली आहे. परंतु निश्चित कधी या कार्यालयाचे स्थानांतरण होणार असल्याचे कुणी सांगण्यास तयार नाहीत. यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. आधी मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण करण्याची ओरड सुरू झाली आहे.दुर्लक्षितपणाचा फटकाचुल्हाडात पाटबंधारे विभागाची वसाहत आणि रनेरा गावात असलेला विश्रामगृह दुर्लक्षितपणामुळे पडक्या अवस्थेत आहे. या जागेत फक्त सांगाडा शिल्लक आहे. यामुळे रिकाम्या वसाहती नागरिकांच्या कल्याणार्थ उपयोगात आणण्यासाठी सरसकट अन्य शासकीय कार्यालयांना देण्याची ओरड परिसरात सुरू झाली आहे. यामुळे या वसाहतीची जोपासणा होणार आहे तथा नागरिकांना न्याय मिळणार आहे.मुख्यमंत्र्यांना निवेदन देणारपाटबंधारे विभागाचा विश्रामगृह दुर्लक्षित झाला आहे. या विश्रामगृहाच्या जागेत पोलीस यांचे करिता निवासस्थानांचे बांधकाम करण्यात यावे. याशिवाय पाटबंधारे विभागाच्या जागेत असणारी रिकामी वसाहत अन्य शासकीय कार्यालयांना देण्यात यावी. जेणे करून एकाच व्यासपिठावर शेतकऱ्यांचे समस्या सोडविल्या जाणार असल्याचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविणार असल्याची माहिती भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष मोतीलाल ठवकर यांनी दिली.