गोंदिया : राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या महिनाभरात अवैध दारूभट्ट्यांविरूद्ध राबविलेल्या मोहीमेत २२ वारस आणि १३ बेवारस अशा एकूण ३५ हातभट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. यात ४ लाख ४५ हजार ७७५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचारसंहितेच्या काळात दारू गाळणाऱ्यांविरूद्ध विशेष मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्याचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनात १ ते २९ सप्टेंबर या कालावधीत निरीक्षक सुरेश डोंगरे, दु.निरीक्षक शहर व ग्रामीण यांनी मिळून गोंदिया शहर, ग्रामीण तसेच तिरोडा भागात विविध ठिकाणी छापे टाकले. यात २२ वारस भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. तसेच १३ बेवारस हातभट्ट्या आढळल्या. त्या सर्व नष्ट करण्यात आल्या. यात ७९७ लिटर मोहा दारू, १८ हजार ७७० लिटर मोहा सडवा व इतर साहित्य जप्त करून गुन्हे नोंदविण्यात आले. सदर कारवाई निरीक्षक सुरेश डोंगरे, दु.निरीक्षक शहर संतोष भटकर, दु.निरीक्षक ग्रामीण मंडलवार आणि त्यांचे सहकारी स.दु.निरीक्षक छगन हुने तसेच राजेश ढाले, सुनील पागोडे, सुनील जुडे, कांबळे, वाहनचालक सोनबर्से आदींनी केली.दुय्यक निरीक्षकांनी केलेल्या कारवाईत ११ गुन्हे नोंदविण्यात आले. त्यात ६ वारस तर ५ वेवारस भट्ट्या उध्वस्त करून ३१२ लिटर मोहा दारू आणि ७९२० लिटर सडवा जप्त करण्यात आला. वरील कारवाईत मदनलाल अंतु जांभुळकर रा.काचेवानी, सुखदेव अंतु जांभुळकर, परसराम मलेश बळगेवार रा.बनाथर, सहेसराम सेगू देव्हारे रा.ठाणेगाव, कैलाश रामचंद्र वासनिक रा.ठाणेगाव, फुलचंद जंगलू शेंडे रा.सुकळी, सेहसराम गोमन कुराडे रा.पांढराबोडी, गुलाब ग्यानीराम दिहारी रा.गिरोला, करवीर हिरालाल उईके रा.ओझीटोला, दुर्गाप्रसाद राधेलाल लांजेवार रा.चुटिया, महेश गणपतराव वंजारी रा.सिंगलटोली, देवराव बालकदास मेश्राम रा.रामनगर गोदिया, मुकेश ताराचंद सांडेकर रा.ढाकणी, कैलाश मनोहर मेश्राम रा.ढाकणी, आशिष रवींद्र टेंभेकर रा.सोनेगाव, शिवचरण रतिराम टेकाम रा.चुटिया आदी आरोपींना अटक करण्यात आली आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या मोहिमेत ३५ भट्ट्या उद्ध्वस्त
By admin | Updated: September 30, 2014 23:37 IST