शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभाग म्हणतो, चार दिवसात येणार युरिया; विक्रेते म्हणतात साठा संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 12:15 IST

गोंदिया जिल्ह्यात युरियाची पुन्हा टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना रोवणीसाठी युरिया खत मिळत नसल्याचे त्यांची कोंडी झाली असून युरियाचा पुरवठा करा हो अशी ओरड शेतकऱ्यांची होत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देयुरियामुळे शेतकऱ्यांची कोंडी कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात पाच दिवसांपूर्वीच १३०० मेट्रीक टन युरियाची रॅक आली होती.यानंतर या युरियाचा जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांना पुरवठा सुध्दा करण्यात आला. मात्र हा साठा दोन दिवसातच संपल्याने जिल्ह्यात युरियाची पुन्हा टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना रोवणीसाठी युरिया खत मिळत नसल्याचे त्यांची कोंडी झाली असून युरियाचा पुरवठा करा हो अशी ओरड शेतकऱ्यांची होत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे क्षेत्र आहे. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. धानाच्या रोवणीसाठी शेतकऱ्यांना सर्वाधिक युरिया खताची गरज असते. त्यामुळे दरवर्षी याच कालावधीत युरियाची मागणी वाढत असते. त्याच दृष्टीने कृषी विभागाने यंदा १४ हजार ४०५ युरियाची मागणी केली होती. यापैकी आतापर्यंत ११ हजार १४३ मेट्रीक टन युरियाचा पुरवठा झाला आहे. मागणीच्या तुलनेत जवळपास ३ हजार ५०० मेट्रीक टन युरियाचा कमी पुरवठा झाल्याने सध्या बाजारपेठेत युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात युरिया खत मिळत नसल्याची ओरड वाढल्यानंतर खा.प्रफुल्ल पटेल यांनी दिल्ली येथील खत कंपन्याच्या वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा करुन खताचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर १५ जुलैला १३०० मेट्रीक टन युरियाची रॅक लागली होती. त्यानंतर या खताचा संपूर्ण जिल्ह्यातील विक्रेत्यांना पुरवठा करण्यात आल्याचा दावा वितरक करीत आहे. मात्र जेवढा युरिया आला त्यापैकी बराच युरिया अद्यापही काही वितरकांनी गोदामात साठवून ठेवल्याची ओरड चिल्लर विक्रेत्यांमध्ये आहे.

शिवाय दोन दिवसांपूर्वीच गोंदिया-गोरेगाव मार्गावरील तुमखेडा येथील गोदामावर स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात युरियाचा साठा आढळला होता. जर जिल्ह्यातील छोट्या विक्रेत्यांना युरियाचा पुरवठा करण्यात आला तर गोदामात ऐवढ्या मोठ्या प्रमाणात युरियाचा साठा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील मोठे विक्रेते जरी युरियाचा सर्व चिल्लर विक्रेत्यांना पुरवठा झाल्याचा दावा करित असले तरी युरियाच्या पुरवठ्या मोठ्या प्रमाणात गौडबंगाल असल्याचे चित्र आहे. त्यामुळे याची वरिष्ठांनी सखोल चौकशी करण्याची गरज आहे.

दीड लाख हेक्टरमधील रोवणी शिल्लकयंदा पावसाचा खंड पडल्याने जिल्ह्यातील रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. आतापर्यंत केवळ ४५ हजार हेक्टरमधील रोवणी आटोपली आहे. १ लाख ४४ हजार हेक्टरमधील रोवणी शिल्लक आहे. त्यातच युरिया मिळत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड वाढली आहे. केवळ २५ टक्के रोवणी झाली असताना ही स्थिती असल्याने ७५ टक्के रोवणी शिल्लक आहे. त्यामुळे युरियासाठी शेतकऱ्यांची अधिक कोंडी होण्याची शक्यता आहे.२६६ रुपयांचा युरिया ३५० रुपयांनाजिल्ह्यात युरियाच्या निर्माण झालेल्या टंचाईचा काही विक्रेते फायदा उठवित आहे. युरियाच्या प्रती चुंगडीची किमत २६६ रुपये ५० पैसे आहे.मात्र काही विक्रेते ३५० रुपये प्रती चुंगडी दराने युरियाची विक्री करित असल्याची शेतकऱ्यांची ओरड सुरू आहे. शेतकऱ्यांना प्रति बॅग १०० रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहे.

टॅग्स :agricultureशेती