शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतच्या कर आकारणीमुळे चांगलेच संतापले आहेत देवरीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 05:00 IST

एकीकडे ५२ सफाई कामगारांना नगरपंचायतीने कामावरून काढल्याने सर्वत्र कचरा व घाण पसरली आहे. मग स्वच्छता कर का द्यायचा? हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नगरपंचायत देवरीकडून या तानाशाही टॅक्स आकारणीविरुद्ध देवरीकर न्यायालयाची धाव घेणार असल्याचे कळते.  जुन्या नगरसेवकांना अंधारात ठेवून टॅक्स प्रणाली आकारण्यात आल्याचे नगरसेवक सांगत आहेत. परंतु येणाऱ्या निवडणुकीत नगरसेवकांना या टॅक्सविरोधात नागरिकांना आश्वासन देऊन दिलासाच द्यावा लागेल. 

 विलास शिंदे लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : कर हे नगरपंचायतीचे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. जनतेला सेवा पुरविल्याबद्दल शासनाला कराच्या स्वरूपात मोबदला दिला जातो. परंतु, ज्या सेवा जनतेला पुरविल्या जात नाही, त्या सेवांचे कर देवरीवासीयांकडून नगरपंचायतीव्दारे वसूल करण्यात येत असल्याने देवरीकर कमालीचे संतापले आहे. नगरपंचायतीच्या या अवाढव्य करआकारणीविरोधात न्यायालयात धाव घेण्याची तयारी देवरीवासीयांनी केली आहे. ऐन नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर नगरपंचायतीने बम्पर टॅक्सचे (करआकारणी) मागणी बिल नागरिकांना पाठवून त्यांची झोपच उडवून दिलेली आहे. देवरी नगरपंचायत २०१६ मध्ये अस्तित्वात आली. नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर २०१७ ते २०१९ या दोन वर्षांत नागपूरच्या ३६ असोसिएट्स नावाच्या एजन्सीला करनिर्धारण करण्याकरिता सर्व्हे करण्याचे काम देण्यात आले होते. सर्व चल व अचल संपत्तीचे चार झोन तयार करून सर्व संपत्तीचे नकाशे तयार करून करनिर्धारण करण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांना बोलावून करप्रणाली समजावण्यात आली होती. त्यावेळी नागरिकांनी या करआकारणीवर आक्षेपही नोंदविला होता. परंतु, त्या आक्षेपांचे काय झाले, हे नगरपंचायतीने नागरिकांना कळविले नाही व डिसेंबरपूर्वी कर भरण्यासाठी सर्व देवरीकरांना करमागणी बिल देण्यात आले आहे. या मागणी बिलात वेगवेगळे कर आकारण्यात आल्याने नागरिक चांगलेच संपातले आहेत. एकीकडे ५२ सफाई कामगारांना नगरपंचायतीने कामावरून काढल्याने सर्वत्र कचरा व घाण पसरली आहे. मग स्वच्छता कर का द्यायचा? हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नगरपंचायत देवरीकडून या तानाशाही टॅक्स आकारणीविरुद्ध देवरीकर न्यायालयाची धाव घेणार असल्याचे कळते. जुन्या नगरसेवकांना अंधारात ठेवून टॅक्स प्रणाली आकारण्यात आल्याचे नगरसेवक सांगत आहेत. परंतु येणाऱ्या निवडणुकीत नगरसेवकांना या टॅक्सविरोधात नागरिकांना आश्वासन देऊन दिलासाच द्यावा लागेल. 

शाळा नसतानाही शिक्षण करआकारणी- नगर परिदेने शिक्षण कर, रोजगार हमी कर, अग्निशमन कर, वृक्ष कर हे निरर्थक कर लावून नगरपंचायत नागरिकांची अप्रत्यक्षपणे लूट करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यात प्रामुख्याने शिक्षण कर हे मालमत्ताकराच्या ५० टक्के लावल्याने नागरिकांमध्ये नगरपंचायतीविरुद्ध चांगलाच रोष आहे. देवरीत नगरपंचायतीव्दारे एकही शाळा संचालन करत नसून हा शिक्षणकर एवढा कसा ? हाच संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. नगरपंचायत अधिनियमानुसार ५ टक्के शिक्षणकर शासनाला भरणे नगरपंचायतीला बंधनकारक आहे. परंतु मालमत्ताकराच्या ५० टक्के शिक्षणकर लावून नगरपंचायतने एक प्रकारची लूटच सुरू केल्याचे दिसून येत आहे.

शासनाच्या नियमानुसार टॅक्स लावण्यात आले असून निर्धारित टॅक्सच्या ५० टक्के रक्कम १५ दिवसांच्या आत भरून टॅक्सधारक या विरुद्ध अपील करू शकतात. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एक कमिटी गठीत करून त्यामध्ये टॅक्स निर्धारण केले जाणार आहे. -अजय पाटणकर, मुख्याधिकारी  

 

टॅग्स :Taxकर