शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देवरी तालुका झाला कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 05:00 IST

कोरोनावर हाती आलेल्या लसींमुळे तिसऱ्या लाटेला आपली मुळे मजबूत करता आली नाहीत. मात्र, प्रादुर्भाव वाढला व या लाटेतही कित्येकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. तब्बल दोन ते अडीच महिन्यांपासून प्रादुर्भाव असलेली तिसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. यामुळेच आता जिल्ह्यातही बाधितांची संख्या चांगलीच नियंत्रणात आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : रस्ते वाहतूक मंत्रालयाने  तब्बल दोन ते अडीच महिने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने विळख्यात अडकलेल्या जिल्ह्यात आता कोरोनाची तिसरी लाट ओसरताना दिसत आहे. यामुळे आता बाधितांची संख्या नियंत्रणात आली असून असे असतानाच देवरी तालुका रविवारी (दि.२०) कोरोनामुक्त झाला आहे. विशेष म्हणजे, आणखी ५ तालुक्यांत मोजकेच रूग्ण असल्याने ते सुद्धा कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. कोरोनाच्या २ लाटांनी होत्याचे नव्हते केले व कधीही न विसरता येणारी आठवण कायम केली आहे. त्यानंतर आता कोरोनाची तिसरी लाट आली असून डिसेंबर महिन्यापासून तिसऱ्या लाटेने आपला प्रादुर्भाव दाखविला आहे. कोरोनावर हाती आलेल्या लसींमुळे तिसऱ्या लाटेला आपली मुळे मजबूत करता आली नाहीत. मात्र, प्रादुर्भाव वाढला व या लाटेतही कित्येकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. तब्बल दोन ते अडीच महिन्यांपासून प्रादुर्भाव असलेली तिसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. यामुळेच आता जिल्ह्यातही बाधितांची संख्या चांगलीच नियंत्रणात आली आहे. जिल्ह्यात रविवारची (दि.२०) स्थिती बघितल्यास फक्त २ बाधितांची भर पडली असून १४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर जिल्ह्यात फक्त ४८ ॲक्टिव्ह रूग्ण आहेत. मात्र गूडन्यूज अशी की, जिल्ह्यातील देवरी तालुका रविवारी कोरोनामुक्त झाला. विशेष म्हणजे, आता तिरोडा तालुक्यात २, गोरेगाव २, आमगाव ३, सालेकसा २ व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात फक्त १ ॲक्टिव्ह रूग्ण उरला आहे. म्हणजेच, हे तालुकेसुद्धा आता कोरोनामुक्तीच्या वाटेवर दिसून येत आहेत. 

गोंदिया तालुक्यात सर्वाधिक रुग्ण - कोरोनाच्या सुरूवातीपासूनच गोंदिया तालुका हॉटस्पॉट राहिला असून, तिन्ही लाटांमध्ये सर्वात जास्त प्रादुर्भाव व जीवितहानीसुद्धा गोंदिया तालुक्यातच झाली आहे. त्यात अद्याप तालुक्यात सर्वाधिक २८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर सडक-अर्जुनी तालुक्यात १० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामुळे या तालुक्यांना थोडा वेळ असला तरी परिस्थिती नियंत्रणात राहिल्यास काही दिवसांनी जिल्हा परत एकदा कोरोनामुक्त होणार, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. केवळ तीन बाधित रुग्णालयात - देशात मोठ्या प्रमाणात झालेले लसीकरण कोरोनाला आपला डाव साधण्यात अडचणीचे ठरले व तिसरी लाट फक्त सर्दी, खोकला आणि तापावरच राहिली. यातही बाधित घरीच औषध घेऊन बरे झाल्याने त्यांना भरती करण्याची गरज पडली नाही. हेच कारण आहे की, रविवारी जिल्ह्यात ४८ ॲक्टिव्ह रुग्ण असले तरीही फक्त तीन रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या