शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

देवरी ग्रामीण रुग्णालयाचे जर्जर छत कोसळले

By admin | Updated: September 25, 2016 02:26 IST

गेल्या ३५ वर्षापूर्वी बनविण्यात आलेली देवरी ग्रामीण रूग्णालयाची इमारत मेटनेन्सच्या अभावामुळे पूर्णत: जर्जर झाली आहे.

जीवित हानी टळली : जर्जर इमारतीमुळे नवीन इमारतीची मागणीदेवरी : गेल्या ३५ वर्षापूर्वी बनविण्यात आलेली देवरी ग्रामीण रूग्णालयाची इमारत मेटनेन्सच्या अभावामुळे पूर्णत: जर्जर झाली आहे. या इमारतीचे प्रयोगशाळेच्या बाजुकडील बाथरुमवरील छत शुक्रवारला दुपारी कोसळले. यावेळी त्या ठिकाणी कोणीही नसल्याने जीवित हानी टळली. मात्र या इमारतीमधील दुर्लक्षितपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.विशेष म्हणजे तालुक्याच्यास्थळी ग्रामीण रुग्णालय असून ४० खाटांचे हे रुग्णालय बऱ्याच वर्षापासून बनलेले आहे. अधिकारी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इमारत कोसळण्याच्या मार्गावर आलेली आहे. जीव मुठीत घेऊन रुग्ण येथे उपचार घेत असतात. पावसाळ्यात तर समस्या अजूनच गंभीर असते. इमारतीचे छत पूर्णत: जर्जर झाल्याने जागोजागी पाणी गळत असते. काही ठिकाणी तर मोठमोठ्या प्लास्टीक लावून छताचे पाणी अडवल्या जात आहे. या व्यतिरिक्त पाण्याची भिषण समस्या असल्याने रुग्णांना पिण्यासाठी व बाथरुमकरिता घरुन पाणी आणावे लागत आहे. डॉक्टरांचा अभाव, औषधीसाठ्याची कमतरता अशा विविध समस्यांकडे असलेल्या या रुग्णालयात उपचार कसा घ्यायचा हा प्रश्न रुग्णांना पडलेला आहे.जर्जर झालेल्या इमारतीचा प्रश्न आरोग्यमंत्र्याकडे आमदार संजय पुराम यांनी अनेक वेळा मांडला.परंतु अजुनपर्यंत हा प्रश्न मार्गी लागला नाही. इमारतीमुळे केव्हाही मोठा धोका होऊ शकतो. देवरी ग्रामीण रुग्णालयाकरिता नवीन इमारत मंजूर करुन घेण्यात यावी याकरिता ६ सप्टेंबर २०१६ रोजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची भेट घेऊन आमदार पुराम यांनी ही समस्या मंत्र्यासमोर मांडली. लवकरच इमारतीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आ.पुराम यांनी सांगितले.(तालुका (प्रतिनिधी)