शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूने वाढविला ड्रॅगन फ्रुटचा भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:01 IST

कपिल केकत सध्या श्रावण मासाचे उपवास सुरू असून, सोबतच सणासुदीलाही प्रारंभ झाल्यामुळे फळांना मागणी वाढली आहे. परिणामी, फळांचे दर ...

कपिल केकत

सध्या श्रावण मासाचे उपवास सुरू असून, सोबतच सणासुदीलाही प्रारंभ झाल्यामुळे फळांना मागणी वाढली आहे. परिणामी, फळांचे दर चढले असतानाच, डेंग्यूमुळे मात्र ड्रॅगन फ्रुट भाव खात आहे. डेंग्यूवर ड्रॅगन फ्रुट उतारा असल्याचे बोलले जात असल्याने, ड्रॅगन फ्रुटला मागणी वाढल्याचे त्याचे दरही वाढले असतानाच, सध्या शहरातील बाजारात ड्रॅगन फ्रुटचे शॉर्टेज असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

--------------------------------

फळांचे दर (प्रति किलो)

ड्रॅगन फ्रुट- १६०

डाळिंब- १००

सफरचंद- १००

संत्रा- ६०

मोसंबी- ६०

चिकू- ६०

पपई- ३०

पेरू -८०

--------------------------

डेंग्यूवर ड्रॅगनचा उतारा

ड्रॅगन फ्रुटमध्ये मोठ्या प्रमाणात सेलेनियम, झिंक, व्हिटॅमिन-सी सारखे मायक्रो न्युट्रिएंट व अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात. यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते व मोसमी, तसेच व्हायरल फिव्हरशी लढायला आपल्या शरीराला ताकत मिळते. यामुळे ड्रॅगन फ्रुटचे सेवन शरीरासाठी खूपच फायदेशीर असल्याचे येथील केटीएस जिल्हा रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले.

----------------------------------

आवक वाढल्याने सफरचंद स्वस्त

सध्या ड्रॅगन फ्रुट भाव खात असतानाच पुरवठा नसल्याने त्याचे शॉर्टेज झाले आहे, तर दुसरीकडे २०० रुपयांपेक्षा जास्त दराने विकले सफरचंद सध्या घसरले असून, आवक वाढल्यामुळे ते सध्या १०० रुपये किलो दराने विकले जात आहे. येथे सफरचंद नागपूर येथून आणले जातात. सध्या आवक मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचे दर घसरल्याचे व्यापारी सांगतात.

------------------------------

ड्रॅगन फ्रुटचे शॉर्टेज

मध्यंतरी ड्रॅगन फ्रुट १२०-१३० रुपये किलो दराने विकले जात होते व त्यांची आवकही होती. मात्र, सध्या ड्रॅगनची फ्रुटची मागणी वाढली असतानाच त्यांचा पुरवठा होत नसल्याने शॉर्टेज आहे. यामुळे ड्रॅगन फ्रुट महागले असून, सध्या १६० रुपये किलो दराने त्याची विक्री होत आहे.

- नवीन रूसे, फळ विक्रेता