शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूने घेतला आणखी एका मुलीचा बळी?

By admin | Updated: September 9, 2014 00:27 IST

गोंडमोहाळी ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या किंडगीपार येथील विद्या विनोद सादेपाच (१४) या मुलीचा गोंदिया येथील बजाज रुग्णालयात सोमवारी सकाळी ८ वाजता मृत्यू झाला. तिचा मृत्यू डेंग्युमुळे

घाणीचे साम्राज्य : ग्रामपंचायतचे दुर्लक्षपरसवाडा : गोंडमोहाळी ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या किंडगीपार येथील विद्या विनोद सादेपाच (१४) या मुलीचा गोंदिया येथील बजाज रुग्णालयात सोमवारी सकाळी ८ वाजता मृत्यू झाला. तिचा मृत्यू डेंग्युमुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र त्याबाबतचा अहवाल अद्याप मिळालेला नाही.प्राप्त माहितीनुसार, विद्या विनोद सादेपाच हिची प्रकृती चार दिवसाअगोदर बिघडली होती. गावातील डॉक्टरकडून उपचार केले पण सुधारणा झाली नाही. तिरोडा येथील डॉ.मेश्राम यांच्या रुग्णालयात नेले असता त्यांनी प्राथमिक उपचार करुन डॉ.बजाजकडे नेण्याचा सल्ला दिला. सोमवारी (दि.८) गोंदिया येथे नेले असता सकाळी ८ वाजता मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ६ सप्टेंबरला सुकेसना कन्हैयालाल बघेले (३५) या महिलेचाही डेंग्यूने मृत्यू झाला होता. इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्र गोंडमोहाळी अंतर्गत किंडगीपार गाव येत असून गावात स्वच्छता ठेवण्याबाबत ग्रामपंचायतीला कळविण्यात आले. आमची चमू १५ दिवस, आठ दिवसात गावाची तपासणी करते. त्यावेळी गावात रुग्ण नव्हते. सदर मुलीचा रक्ताचा नमुना आमच्याकडे नाही. मुलगी ८ वीची विद्यार्थिनी असून शाळेत दररोज जात असे. शाळेतही तपासणी केली जाते व आमची पुन्हा संपूर्ण गावात घरोघरी जाऊन प्रत्येकाचे रक्ताचे नमूने घेत आहे. आतापर्यंत डेंग्यू पॉझीटिव्ह रिपोर्ट आला नाही. रक्ताचे नमूने पुन्हा पाठविले आहे. सध्या केवळ ते संशयित आहेत. गावातील नागरिकांच्या घरीच दुषित पाणी व घाण असल्याने आजार वाढत असल्याचे इंदोरा बुज.प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. आर. आईटवार यांनी सांगितले. ६ सप्टेंबरला सुकेसना बघेले या महिलेचा मृत्यू झाला, पण रिपोर्ट न आल्याने तो मृत्यू डेंग्युनेच झाला की नाही, हे सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले. (वार्ताहर)