शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:15 IST

मागील वर्षी निवेदन देऊनही प्रभागातील समस्या मार्गी न लागल्याने शहरातील प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक सुनील तिवारी यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच मंगळवारी (दि.१०) धरणे आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देवर्षभरापासून मागणी प्रलंबित : नगर परिषदेचा गलथान कारभार उघड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षी निवेदन देऊनही प्रभागातील समस्या मार्गी न लागल्याने शहरातील प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक सुनील तिवारी यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच मंगळवारी (दि.१०) धरणे आंदोलन सुरू केले आहे. कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक असलेले तिवारी यांच्यासोबत पक्षातील अन्य नगरसेवक व पदाधिकारी सहभागी झाले. दरम्यान नगरसेवकाला समस्या मार्गी लागत नसल्याचे धरणे आंदोलन करावे लागत असेल तर शहरातील नागरिकांचे काय? असा सवाल देखील यामुळे उपस्थित केला जात आहे.शहरातील प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक असलेले तिवारी यांनी प्रभागातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेत तीन नवीन पाणी टाक्या, एक बोअरवेल व एक टाकी दुरूस्त करून देण्याची मागणी केली होती. यासाठी त्यांनी १५ मार्च २०१७ रोजी म्हणजेच मागील वर्षी नगराध्यक्षांना निवेदन दिले होते. नगराध्यक्ष अशोक इंगळे व मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत आठ दिवसांत मागण्यांची पूर्तता करणार असे आश्वासनही दिले होते असे तिवारी यांनी सांगीतले. मात्र आता वर्षभरापेक्षा जास्त कालावधी लोटूनही तिवारी यांच्या मागण्यांची पूर्तता झाली नाही. यंदा शहरात पाण्याची टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना याची झळ बसू नये, यासाठी तिवारी यांनी कुणालाही विनवणी करण्यापेक्षा मंगळवारी (दि.१०) थेट मुख्याधिकारी पाटील व नगराध्यक्ष इंगळे यांच्या कक्षासमोर धरणे आंदोलन सुरू केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत कॉंग्रेस पक्षाचे गट नेता व सभापती शकील मंसुरी, कॉंग्रेस कमिटी शहर अध्यक्ष अशोक चौधरी, नगरसेवक भागवत मेश्राम, देवा रूसे, आलोक मोहंती, संदीप रहांगडाले, हरीश तुळसकर, रोहन रंगारी, निकेतन अंबादे, हिमांशू सोनकुसरे, गौरव चन्नेकर, शुभम सहारे, निक्की येडे व कार्यकर्ते उपस्थित होते.पालिकेच्या अकार्यक्षम कारभाराची प्रचितीमागील वर्षी करण्यात आलेल्या मागण्यांची पूर्तता होत नाही. विशेष म्हणजे, आता नगरसेवकांच्याच मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नगरसेवकांना धरणे द्यावे लागत आहे. त्यामुळे या प्रकारातून पालिकेचा कारभार किती सुरळीत सुरू आहे अशी प्रतिक्रीया नगर परिषद वर्तुळात उमटू लागल्या आहे. नगरसेवकांनाच आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाची पाळी आली असताना सर्वसामान्यांच्या समस्यांचे काय असा सवालही उपस्थित केला जात आहे.नगराध्यक्षांकडून मनधरणीचा प्रयत्नतिवारी धरणे देऊन बसले असतानाच नगराध्यक्ष इंगळे कार्यालयात आले. हा प्रकार बघून त्यांनी तिवारी व उपस्थित अन्य सदस्य व कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कक्षात या चर्चा करू असे म्हणत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वर्षभरापासून मागण्यांची पूर्तता होत नसल्याने चांगलेच रागावलेले तिवारी यांनी कक्षात जाण्याचे टाळले. जोपर्यंत मागण्याची पूर्तता होत नाही तोपर्यंत धरणे सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.