केशोरी हे गाव पाच हजार लोकसंख्येचे असून येथील ग्रामपंचायत अंतर्गत घरगुती नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन योजना कार्यान्वित केली आहे. गावात पाण्याचा शुद्ध पुरवठा करणे ही ग्रामपंचायत प्रशासनाची जवाबदारी असते. अनेकदा घरगुती नळाद्वारे येणारे पाणी गढूळ किंवा अशुद्ध असते. नेहमी नळाद्वारे हिरव्या रंगाची वनस्पती येत असल्याचे दिसून येते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. किमान महिन्यातून दोन-तीनदा ब्लिचिंग पावड पाण्याच्या टाकीमध्ये टाकणे आवश्यक आहे. पाण्याच्या टाकीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकतात किंवा नाही शंका वाटत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन घरगुती नळाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर प्लॉन्ट बसवून नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
फिल्टर प्लाँट बसविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:28 IST