शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय आकाशदिव्यांना डिमांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:38 IST

दिव्यांचा मंद प्रकाश व आकाशदिव्यांचा लखलखाट याशिवाय दिवाळीचा सण साजराच होऊ शकत नाही. म्हणूनच सध्या गोंदियाकरांची या साहित्यांच्या खरेदीसाठी धावपळ सुरू आहे. रंगबिरंगी वेगवेगळ््या प्रकारच्या आकाशदिव्यांनी बाजारपेठ सजलेली दिसून येत आहेत.

ठळक मुद्देरंगबिरंगी आकाशदिवे बाजारात : मध्यम रेंजला ग्राहकांची पसंती

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिव्यांचा मंद प्रकाश व आकाशदिव्यांचा लखलखाट याशिवाय दिवाळीचा सण साजराच होऊ शकत नाही. म्हणूनच सध्या गोंदियाकरांची या साहित्यांच्या खरेदीसाठी धावपळ सुरू आहे. रंगबिरंगी वेगवेगळ््या प्रकारच्या आकाशदिव्यांनी बाजारपेठ सजलेली दिसून येत आहेत.प्रकाशाच्या या सणात दिव्यांचा मान असून महालक्ष्मीच्या स्वागतासाठी घराच्या दारापासून अवघे घर प्रकाशमान केले जाते. यात दिव्यांच्या मंद प्रकाशाला आकाशदिव्यांच्या लखलखाटाची साथ महत्वाची असते. म्हणूनच दिवाळीच्या दिवशी नवीन दिवे लावण्याचा मान असतानाच त्याच्यासोबत आकाशदिवा हा हमखास लावला जातो. घराच्यासमोर प्रकाश देणारा आकाशदिवा आता घरोघरी दिसून येणार आहे. नेमकी हीच बाब हेरून विक्रेते दरवर्षी आकाशदिव्यांच्या नवनवीन व्हेरायटी ग्राहकांसाठी घेऊन येतात.त्यानुसार यंदाही बाजारपेठ रंगबिरंगी वेगवेगळ््या प्रकारच्या आकाशदिव्यांनी सजलेली दिसून येत आहे. तर ग्राहकांची आतापासूनच खरेदीसाठी गर्दीही दिसून येत आहे. सध्या भारतीय बाजारपेठेत चायनीज वस्तूंची चांगलीच चलती असताना आकाशदिव्यांनाही आता चायनीज ज्वर चढला होता.भारतीय पद्धतीच्या विविध आकाशदिव्यांनी सर्वांनाच भुरळ घातली असून त्यांना चांगलीच मागणी आहे. सध्या आकाशदिव्यांतही कापडी आकाशदिवे भेटत असल्याने त्यांची चांगली मागणी दिसते.कापडी आकाशदिवे जास्त काळ टिकतात. त्यातही विविध प्र्रकारचे आकाशदिवे आता बाजारात बघावयास मिळत आहेत. कापडी तसेच प्लास्टीक शीटपासूनचेही विविध आकाशदिवे बाजारात उपलब्ध आहेत.२५- २५० रूपयांपर्यंतची रेंजसध्या बाजारात २५ रूपयांपासून २५० रूपयांपर्यंतच्या आकाशदिव्यांची रेंज दिसून येत आहे. यापेक्षाही जास्त दराचे आकाशदिवे विक्रीसाठी आहेत. मात्र ग्राहक जास्त महाग आकाशदिव्यांची खरेदी न करता मध्यम रेंजच्या दिव्यांना पसंती देत असल्याचे विक्रेते सांगतात. यातही आता आकाशदिव्यांत कापडांपासून तयार केलेले दिवे बाजारात आले आहेत. कापडांचे असल्याने त्यांना स्वच्छ करून नीट ठेवल्यास पुढील वर्षीही त्यांचा वापर करता येतो. त्यामुळे कागदांच्या आकाशदिव्यांऐवजी कापडांच्या आकाशदिव्यांची खरेदी ग्राहक जास्त करीत आहे.