शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चुटियाच्या राखीला राज्यभरात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

तालुक्यातील चुटिया येथील रहिवासी ऋषी टेंभरे व त्यांच्या पत्नी प्रीती टेंभरे या दाम्पत्याने ५ वर्षांपूर्वी गावात गीर प्रजातीच्या गायींची गौशाळा उघडली. या गौशाळेला फक्त दुधापर्यंत मर्यादित न ठेवता या गाईच्या शेणापासून सेंद्रिय खत व अगरबत्ती तयार केली. तर गौमुत्रापासून फिनाईल व औषधेही तयार केली जातात.

ठळक मुद्देशेणापासून राखी निर्मिती : टेंभरे दाम्पत्याने ठेवला आत्मनिर्भरतेचा आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लॉकडाऊन काळात सर्वच उद्योग ठप्प झाल्यामुळे उद्योग व व्यवसायांमध्ये कर्मचारी कपात करण्यात आली. कोरोनाच्या भीतीमुळे लाखो कामगार आपल्या स्वगृही परतले. अशाच परिस्थितीत मात्र, तालुक्यातील ग्राम चुटिया येथील एका महिलेने आत्मनिर्भर होत अनेक महिलांना रोजगार देत आदर्श निर्माण केला आहे. ग्राम चुटिया येथील प्रीती टेंभरे यांनी गाईच्या शेणापासून राख्या बनविण्याचे प्रशिक्षण देत महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी बनवलेल्या या इको फ्रेंडली राख्यांना जिल्ह्यासह राज्यात तसेच दुसया राज्यातही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.तालुक्यातील चुटिया येथील रहिवासी ऋषी टेंभरे व त्यांच्या पत्नी प्रीती टेंभरे या दाम्पत्याने ५ वर्षांपूर्वी गावात गीर प्रजातीच्या गायींची गौशाळा उघडली. या गौशाळेला फक्त दुधापर्यंत मर्यादित न ठेवता या गाईच्या शेणापासून सेंद्रिय खत व अगरबत्ती तयार केली. तर गौमुत्रापासून फिनाईल व औषधेही तयार केली जातात.कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून जनतेला आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला होता. त्यात आता भारत-चीन सीमावादामुळे चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात येत आहे. हीच परिस्थिती लक्षात घेतात प्रीती यांना रक्षाबंधनाच्या उत्सवात गाईच्या शेणापासून इको फ्रेंडली राखी बनविण्याची संकल्पना सूचली. त्यांनी कामाला सुरूवात करत आधी या संकल्पनेबाबत अभ्यास केला आणि त्यानंतर आपली ही संकल्पना साकार केली. आतापर्यंत त्यांनी गाईच्या शेणापासून जवळपास ^सहा हजार इको फ्रेंडली राख्या तयार केल्या. जिल्हा व राज्यच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश, केरळ, राजस्थान सारख्या इतर राज्यांतही या राख्यांना मागणी आहे.या माध्यमातून त्यांनी गावातील अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांना रोजगाराशी संबंधित प्रशिक्षणही द्यायला सुरु वात केली आहे. गाईच्या शेणापासून राखी कशाप्रकारे तयार करता येते, हे देखील शिकविण्यात आले.प्रीती टेंभरे यांच्या लघु उद्योगात त्याचे पती ऋषी टेंभरे हे माकेर्टींगचे काम पाहतात. आपल्याकडे तयार केलेल्या राख्या बाजारात विक्रीकरीता जाताना कुठलीही कमी राहू नये, राख्यांना पॅक करून पोहोचविणे याकडे प्रीती यांच्या जाऊ श्वेता टेंभरे विशेष लक्ष देतात.गौहत्या थांबविण्याचा संदेशगाईपासून फक्त दूध न मिळविता तिच्यापासून मिळणाऱ्या शेणापासून औषधे व राख्या बनविणे इतकेच मर्यादित न राहता गौहत्या थांबविणे हा या मागचा मुख्य उद्देश असल्याचे प्रीती सांगतात. विशेष म्हणजे, यासाठी राखीच्या मागच्या भागावर गायी वाचविण्याचा सामाजिक संदेशही दिला जात आहे. यापुढे गाईच्या शेणापासून दिवाळीनिमित्त इको फ्रेंडली दिवेदेखील बनविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन