शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

परिसरातील रेतीघाटांचा लिलाव करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 05:00 IST

 परिसरातील रेती घाटाची लिलाव प्रक्रिया गेल्या २ वर्षांपासून खोळंबली आहे. याचे कारण जाणून घेतले असता रेती उपसा केल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्याचे कारण पुढे करुन रेतीघाटांचा लिलाव करणे थांबविण्यात आल्याचे समजले आहे. परंतु हे कारण संयुक्तीक वाटत नाही, उलट लिलाव प्रक्रिया थांबविल्यामुळे रेती चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरीचे प्रकरण दडपण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खिसे गरम करण्याचा वैयक्तीक फायद्याचा उद्देश सफल होत असल्याचा आरोप नागरीक करीत आहेत.

ठळक मुद्देलिलाव करण्यास टाळाटाळ : पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्याचे कारण पुढे

    लाेकमत न्यूज नेटवर्ककेशोरी :  या परिसरातील वडेगाव (बंध्या) व धोबल या रेतीघाटांचा लिलाव न केल्यामुळे घरकुल व घरांचे बांधकाम अडचणीत आले आहे. घरबांधणीसाठी रेती हे अत्यंत महत्वाचे घटक असून रेतीशिवाय घर बांधकाम पूर्णत्वास जावू शकत नाही. हे शासनास माहिती असताना सुध्दा रेती घाट लिलाव प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे शासनाला मिळणारे लाखो रुपये बुडत आहेत. याची जाण ठेवून केशोरी परिसरातील रेती घाट लिलाव करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.  परिसरातील रेती घाटाची लिलाव प्रक्रिया गेल्या २ वर्षांपासून खोळंबली आहे. याचे कारण जाणून घेतले असता रेती उपसा केल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्याचे कारण पुढे करुन रेतीघाटांचा लिलाव करणे थांबविण्यात आल्याचे समजले आहे. परंतु हे कारण संयुक्तीक वाटत नाही, उलट लिलाव प्रक्रिया थांबविल्यामुळे रेती चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरीचे प्रकरण दडपण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खिसे गरम करण्याचा वैयक्तीक फायद्याचा उद्देश सफल होत असल्याचा आरोप नागरीक करीत आहेत. रेतीघाटांचा लिलाव होत नसल्यामुळे मंजूर झालेल्या घरकुलांचे काम अडले आहेत. रेतीशिवाय घरकुल बांधकाम कसे करावे असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांना पडला आहे. जिल्हा प्रशासन हेतुपुरस्सर शासनाला मिळणाऱ्या रेती घाट लिलावापासून मिळणारे लाखो रुपयांचे नुकसान करीत आहे असा आरोप करीत रेती चोरी करणाऱ्यांकडून अवैधरित्या चिरीमीरी घेवून लाखो रुपयाची माया जमविणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी शासनानेच मार्ग मोकळा करुन दिल्याचे बोलले जात आहे. रेती चोरी प्रकरणाला शासनच जबाबदार आहे हे निश्चित समजून कुंपणच शेत खात असेल तर यावर नागरिकांचा काहीच उपाय चालणार नाही असे वाटून जात आहे. रेतीघाट लिलाव प्रक्रिया थांबल्यामुळे घरकुलासह इतर लोकांच्या घर बांधणीचे काम प्रभावित झाले आहेत. यामुळे मात्र रेती चोरी प्रकरणे वाढत असून या प्रकरणी शासनच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. रेती चोरी थांबविण्यासाठी रेतीघाटांचा लिलाव होणे गरजेचे आहे. करीता जिल्हा प्रशासनाने याची दखल घेवून परिसरातील रेतीघाटांचा लिलाव करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :sandवाळू