शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

हातपंपांच्या पाईपसाठी १० लाखांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 22:05 IST

ज्या हातपंपांचे पाईप लाईन कमी आहे, पाईप गळले आहेत किंवा उन्हाळ्यात पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे पाणी येत नाही त्या हातपंपांचे पाईप वाढविण्यासाठी पाईप खरेदीसाठी स्थानिक विकास निधीतून आमदारांनी १० लाखांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी जि.प. सदस्य सुरेश हर्षे यांनी आमगाव नगर परिषद सभागृहात झालेल्या पाणी टंचाई आढावा सभेत केली.

ठळक मुद्देआमगावात पाणीटंचाई आढावा सभा : सुरेश हर्षे यांच्या मागणीला आमदारांचा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : ज्या हातपंपांचे पाईप लाईन कमी आहे, पाईप गळले आहेत किंवा उन्हाळ्यात पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे पाणी येत नाही त्या हातपंपांचे पाईप वाढविण्यासाठी पाईप खरेदीसाठी स्थानिक विकास निधीतून आमदारांनी १० लाखांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी जि.प. सदस्य सुरेश हर्षे यांनी आमगाव नगर परिषद सभागृहात झालेल्या पाणी टंचाई आढावा सभेत केली. यावर आ. संजय पुराम यांनी स्थानिक विकास निधी अंतर्गत १० लाखांचा निधी पाईप खरेदीसाठी देण्याचे आश्वासन दिले.आमगाव नगर परिषद सभागृहात पाणी टंचाई आढावा सभा आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. सदस्य सुरेश हर्षे, उषा मेंढे, सुखराम फुंडे, जियालाल पंधरे, शोभेलाल कटरे, सभापती वंदना बोरकर, जयप्रकाश शिवणकर, छबू उके, लोकेश अग्रवाल, तहसीलदार साहेबराव राठोड, खंडविकास अधिकारी पाटी, विस्तार अधिकारी रहांगडाले, ग्रामसेव संघटनेचे नेते कमलेश बिसेन, सरपंच हंसराज चुटे, सुनील ब्राह्मणकर, खेमन टेंभरे, सुनंदा उके व इतर सरपंच उपस्थित होते.या वेळी प्रस्तावित पाणी टंचाई आराखडा गट विकास अधिकारी पाटील यांनी सादर केला. त्यानंतर आमदार पुराम यांनी आराखड्यावर चर्चा सुरू केली. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत माहिती उपस्थितांकडून जाणून घेण्यात आली.या वेळी जि.प. सदस्य हर्षे यांनी, २८ फेब्रुवारी २०१८ च्या ग्राम विकास विभागाच्या पत्रामुळे विद्युत कंपन्या अनेक गावांतील पाणी पुरवठा योजना, विद्युत पथदिव्यांसह विविध योजनांची वीज जोडणी कापतात. त्यामुळे पाणी टंचाई कशी दूर होईल. शासनाचे हे पत्र ग्रामपंचायतींना कर्जबाजारी करणारे आहे. १४ व्या वित्त आयोगांतर्गत छोट्या ग्रामपंचायतींना नाममात्र तीन ते चार लाख रूपये लोकसंख्येच्या आधारावर मिळतात. तसेच या आयोगाचे नियोजन एप्रिल महिन्यात तयार होते. ते ५ वर्षांचे असते. स्ट्रीट लाईचे बिल भरण्याबाबत किंवा न भरण्यास वीज जोडणी कापण्याबाबत ग्राम विकास कक्ष अधिकारी यांनी पत्र काढले. याच पत्राचा आधार घेवून वीज कंपनीने ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईट व नळ पाणी पुरवठा योजनेच्या जोडण्या कापण्यास सुरूवात केल्याचे सांगितले. परंतु ग्रामपंचायतच्या आराखड्यात तरतूद होण्याआधी व विना मंजुरीने आराखड्यावर खर्च करता येत नाही. तसेच अल्प निधी मिळत असल्याने व त्यामधूनच संगणक चालकासाठी एक लाख ४७ हजार रूपयांची तरतूद शासनानेच आखून दिली आहे. उर्वरित निधीमध्ये शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, महिला व बाल कल्याण, बांधकाम यावर ठरविल्याप्रमाणे खर्च करायचे आहे. मात्र ते शक्य होत नसल्याने आ. पुराम यांच्या समोर २८ फेब्रुवारीच्या शासनपत्राला विरोध करण्यात आला.मागण्या पूर्ण होईपर्यंत आपल्या स्थानिक विकास निधी अंतर्गत १० लाखांचा निधी मंजूर करावा. ज्या हातपंपांचे पाईप लाईन कमी आहे, पाईप गळले आहेत किंवा उन्हाळ्यात पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे पाणी येत नाही त्या हातपंपांचे पाईप वाढविण्यासाठी पाईप खरेदी त्या निधीतून करावे, अशी मागणी जि.प. सदस्य हर्षे यांनी केली. यावर आ. संजय पुराम यांनी १० लाख रूपये स्थानिक विकास निधी अंतर्गत पाईप खरेदीसाठी आश्वासन दिले. तसेच वाढीव निधी व सामान्य लोकवस्तीमध्ये हातपंपांसाठी निधी मंजुरीबाबत शासन दरबारी मागणी करणार असल्याचे सांगितले.लोकसंख्येचे निकष शिथिल करासन १९९८ च्या पाणी टंचाई हातपंप मंजुरीच्या शासन आदेशानुसार, एका गावाला प्रत्येक हातपंपामागे २०० लोकसंख्या असणे गरजेचे आहे. जरी एकूण लोकसंख्या गुणीला हातपंप अधिक असल्यास पाणी टंचाई असली तरीपण पाणी टंचाईचे हातपंप मंजूरच होत नाही. अनुसूचित जाती-जमाती वस्तीसाठी आधी अधिक निधी मिळत असे. परंतु मागील वर्षापासून नाममात्र निधी मिळतो. सामान्य लोकांच्या वस्तीत हातपंप मंजूरच नाही. मग पाणी टंचाई कशी दूर होईल. सामान्य वस्तीकरिता निधी व अनुसूचित जाती-जमातीच्या निधीत वाढ करावे, पाणी टंचाईत हातपंप मंजुरीसाठी २०० लोकसंख्येचे निकष शिथिल करावे, जिल्हा दुष्काळी स्थितीत असूनही दुष्काळग्रस्त घोषित झाला नाही, पण पाण्याची टंचाई लक्षात घेता विशेष बाब म्हणून जिल्ह्याला अधिक निधी हातपंप व उपाययोजना आखण्यासाठी मिळवून द्यावी, अशी मागणी सुरेश हर्षे यांनी केली.