शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मोडक्या वर्गखोल्यांपासून सुटका

By admin | Updated: May 28, 2017 00:05 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेतील अनेक वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. त्या मोडक्या वर्गेखोल्यामध्ये विद्यार्थ्यांने ज्ञानार्जन करु नये

१३१ नवीन वर्गखोल्या नरेश रहिले । लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : स्थानिक स्वराज्य संस्थेतील अनेक वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. त्या मोडक्या वर्गेखोल्यामध्ये विद्यार्थ्यांने ज्ञानार्जन करु नये यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ३३१ नविन वर्गखोल्यांचे बांधकाम तर १८१ शाळांची दुरुस्ती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा वार्षीक योजनेतून ५ कोटी ३१ लाख रुपये मंजूर झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अनेक वर्गखोल्या जिर्ण झालेल्या आहेत. त्या जीर्ण वर्गखोल्या पडून कधी विद्यार्थ्यांचा घात होईल हे सांगता येत नाही. गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा १६० शाळा दुरुस्तीसाठी १ कोटी ७१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर नविन इमारत बांधकामासाठी २ कोटी ४७ लाख ५० हजार रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून प्राथमिक शाळाच्या ३०५ वर्गखोल्या नविन बांधल्या जाणार आहेत. माध्यमिक शाळांच्या २६ नविन वर्गखोल्या बांधल्या जाणार असून २१ शाळांची विशेष दुरुस्ती केली जाणार आहे. कोणताही विद्यार्थी जिर्ण वर्गखोल्यामध्ये ज्ञानार्जन करणार नाही. यासाठी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी पुढाकार घेऊन जिल्हा वार्षीक योजनेतून सदर निधी दिला आहे. परंतु या शाळा बांधकामाचे कंत्राट मिळावे यासाठी जि.प.सदस्यांचा प्रयत्न राहणार आहे. ही कामे कुणाच्या पदरी पडतात याकडे सर्व लोकांचे लक्ष राहणार आहे. मागील वर्षात साडे पाच कोटी खर्च जिल्हा परिषदेच्या शाळांची जिर्ण अवस्था सुधारण्यासाठी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ५ कोटी ५० लाख रूपये देण्यात आले होते. त्यापैकी २ कोटी रूपये प्राथमिक शाळांच्या दुरूस्तीसाठी खर्च करण्यात आले. दीड कोटी रूपये प्राथमिक शाळांच्या वर्गखोली बांधकामासाठी खर्च करण्यात आले. तर २ कोटी रूपये हायस्कूलच्या शाळा दुरूस्ती व नविन वर्गखोल्या बांधकामासाठी खर्च करण्यात आले. अनेक वर्षापासून असलेल्या वर्गखोल्या जिर्णावस्थेत मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मागच्या वर्षी जिर्ण शाळांची संख्या मोठी होती. यंदा संख्या अत्यल्प झाली आहे. गरजेच्या ठिकाणी वर्गखोल्या बांधा जिल्हा परिषदेच्या वर्गखोल्या तयार करण्यासाठी जि.प.सदस्यांची जणू चढाओढच लागते. शाळा दुरुस्तीचे किंवा बांधकामाचे कंत्राट आपल्या संबंधीत कंत्राटदाराला मिळावे यासाठी जि.प.सदस्यांचे सभापती कडे प्रयत्न केले जाते. तर काही लोक स्वत: जास्त कामे करवून घेण्यात मशगूल असतात. यामुळे जि.प.सदस्यामध्ये कामावरून हाणामारी होण्याची शक्यता असते. अशा प्रकारचा एक प्रयोग जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घडला. या शाळा दुरुस्ती व बांधकामाच्या कारणावरून जि.प.सदस्यांमध्ये वाद होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. गरज असलेल्या ठिकाणी वर्गखोल्या तयार करण्यात याव्या, अन्यथा आपले वरदहस्त दाखविण्यासाठी जि.प.सदस्यांनी गरज नसलेल्या ठिकाणी वर्गखोल्या बांधकाम करु नये असाही सुर उमटत आहे.