शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी हस्तांतरापूर्वी आकृतीबंध निश्चित करा

By admin | Updated: June 19, 2017 01:28 IST

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने अधिकारी-कर्मचारी जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

आंदोलनाचा इशारा : कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी जलसंधारण विभागाकडेलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने अधिकारी-कर्मचारी जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही कृषी अधिकारी-कर्मचारी जलसंधारणाकडे तर काही कृषी विभागाकडेच राहणार आहेत. अशात हस्तांतरापूर्वी कृषी विभागाचा आकृतीबंध निश्चित करुन प्रलंबित मागण्या मंजूर करण्याची आग्रही मागणी कृषी सहायक संघटनेने केली आहे. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करु अशा इशारा सुध्दा कृषी सहायक संघटनेने दिला आहे. नव्या मृद आणि जलसंधाराण विभागासाठी ३१ मे रोजी शासन आदेश जारी करण्यात आला. कृषी विभागाची अंदाजे दहा हजार पदे नव्या जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित होणार आहेत. सहायकाच्या पदोन्नतीचे महत्वाचे पद जलसंधारण विभागाने घेतले आहे. त्यामुळे नैसर्गिक न्यायाने कृषी सहायकाच्या पदोन्नतीची संधी हिरावून घेतली जात असल्याची भावना कृषी सहायक संघटनेचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. कृषी विभागात बहुतांश पदे रिक्त आहेत. त्यामुळे आकृतीबंध निश्चित झाल्याशिवाय अधिकारी कर्मचारी हस्तांतरण योग्य ठरणार नाही, अशी संघटनेची भूमिका आहे. त्यामुळे कृषी सहायक संघटनेने तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे कृषिमंत्री पाडुरंग पुंडकर यांना निवेदन पाठवून आग्रह केला की, कृषी मंत्र्यांनी कृषी विभागाच्या प्रशासकीय प्रमुखांची बैठक घ्यावी. त्यातून कृषी विभागाची पुनर्बांधणी आणि शेतकरी सेवार्थ आकृतीबंध निश्चित होईल, अशी अपेक्षा संघटनेची आहे. कृषी सहायकाचे पदनाम सहायक कृषी अधिकारी, कृषी सेवक पदाचा तीन वर्षे कालावधी शिक्षण सेवकांप्रमाणे आश्वासित प्रगती योजनेत अंतर्भूत करणे, आंतरविभागीय बदल्यांचे प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंजूर करणे या व इतर मागण्या कृषी सहायक संघटनेच्या आहेत. सदर मागण्यांवर विचार न झाल्यास २१ ते २४ जून दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयावर साखळी उपोषण करण्यात येईल. १७ जून रोजी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयावर मोर्चा, १ जुलै रोजी आयुक्त कार्यालयावर मोर्चा व निदर्शने करण्यात येईल. एवढ्यावर शासनाने दुर्लक्ष केल्यास १० जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु करण्यात येईल, अशा इशारासुध्दा कृषी सहायक संघटनेने दिला आहे. सालेकसा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी.के. ठाकूर, राज्य कार्यकारिणी सदस्य जी.ए. चौधरी, रविशंकर भगत, जिल्हा सचिव इंद्रपाल बागडे, देवेंद्र पारधी, प्रवीण सोनी, हिवराज गजभिये, सुरेंद्र खुणे, तिर्थराज तुरकर, जे.टी. मेंढे, राखलाल भगत आदींनी तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम यांना निवेदन सादर केले.