शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जबाबदारी कमी; ताण कायम!

By admin | Updated: May 23, 2014 00:01 IST

शालेय विद्यार्थ्यांकरीता महत्वपूर्ण व आवश्यक असणारी पोषण आहार योजना केंद्र शासन व शासनाच्या सहकार्याने राबविली जात आहे. या योजनेमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढले,

काचेवानी : शालेय विद्यार्थ्यांकरीता महत्वपूर्ण व आवश्यक असणारी पोषण आहार योजना केंद्र शासन व शासनाच्या सहकार्याने राबविली जात आहे. या योजनेमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढले, मात्र शिक्षकांच्या मानसिक त्रासातही वाढ झाल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे तीन वर्षांपूर्वीपासून पोषण आहारातून मुख्याध्यापकांची मुक्तता व्हावी, अशी मागणी शिक्षक संघटना सातत्याने करत होत्या. याची दखल घेत राज्य शासनाने पुढील शैक्षणिक सत्र २०१४-१५ करिता शालेय पोषण आहार स्वतंत्र यंत्रणेकडे देण्याचे ठरवले आहे. या प्रकाराने मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी झाली असली तरी ताण मात्र कायम असल्याचे जाणवते. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार, शालेय पोषण आहार योजनेतून मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करण्याबाबत पोषण आहार स्वतंत्र यंत्रणेकडे दिल्याचे सांगितले आहे. शालेय पोषण आहारात धान्याची साठवणूक करणे, प्रत्येक दिवसाचा खर्च व जमा हिशेब ठेवणे, शिजविणार्‍या महिलांची निवड करणे, माजी पाल्यांचा खर्च सांभाळणे, चवदार जेवणाची व्यवस्था करणे, जेवणाला चाखून पाहणे, पोषण आहारात विषबाधा किंवा अन्य आपत्तीजनक संकटे निर्माण झाल्यास जबाबदारी स्वीकारणे, धान्यात किंवा अन्य साहित्यात कमी-जास्त झाल्यास कारवाईसाठी जबाबदार असणे अशा अनेक गंभीर समस्या बचत गटाला झेलाव्या लागणार आहेत. ग्रामीण भागात बचत गटाची निवड शालेय पोषण आहार शिजवून देण्याकरिता शालेय व्यवस्थापन समितीने करावी आणि स्वयंपाकी व मदतनिसांची निवड संबंधित बचतगटाने करावयाची आहे. बचत गटाने नोंदविलेली मागणी बरोबर असल्याचे मुख्याध्यापकांना प्रमाणीत करायचे आहे. मुख्याध्यापकांनी धान्य साठा आणि इतर हिशेबाचे अभिलेख महिन्यातून दोन वेळा तपासून याबाबतचा अहवाल गोपनियरित्या गटशिक्षणाधिकार्‍यांकडे पाठवायचा आहे.ग्रामीण भागातील शाळांत रोज किती मुलांनी जेवण केले. आहारात काय मेनू होता. यापासून मुख्याध्यापकाला स्वतंत्र ठेवायचे आहे. या व्यतिरिक्त निकृष्ट दर्जाच्या आहाराचा पूरवठा झाल्यास किंवा विषबाधा झाल्यास, शिल्लक माल व नोंदीनुसार आवश्यक माल यामध्ये तफावत आढळल्यास बचत गटावर कारवाई करण्याची शिफारस मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समिती व गटशिक्षणाधिकार्‍यांकडे करायची आहे. मुख्याध्यापकांच्या शिफारशीवर संबंधित यंत्रणा कारवाई करेल. शिक्षकांनीसुद्धा पोषण आहाराच्या कामात मुख्याध्यापकांना सहयोग करायचे आहे. शिक्षकांना दिवसाचे काम वाटून दिल्यास मुख्याध्यापकांवर ताण येणार नाही, असे परिपत्रकात सांगितले आहे. पोषण आहार महिला बचत गटाकडे दिले असले तरी मुख्याध्यापकांचा ताण कमी झालेला नाही, हे शासनालासुद्धा माहीत आहे. आहाराची चव प्रथम शिजविणार्‍यांनी, शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्‍यांनी व नंतर मुख्याध्यापक किंवा संबंधित शिक्षकांनी घेवूनच विद्यार्थ्यांना देवून वहीत तशी नोंद ठेवायची आहे. शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी बचत गटाची असल्याचे सांगून यात मुख्याध्यापकाला जबाबदार धरण्यात येवू नये. चौकश्ीअंती योग्य निर्णय घेण्याचे सूचविले आहे. अन्न शिजविणे, स्वयंपाकाची भांडी/ताटांची सफाई व भोजनानंतर शालेय परिसराची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी बचत गट आणि आहार शिजविणार्‍या यंत्रणेची राहणार आहे. सावधानतेचा ईशारा म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र, स्थानिक रुग्णालय, रुग्णवाहिका, अग्निशमन यंत्रणा यांचे दुरध्वनी क्रमांक शाळेमध्ये तसेच बचत गटाने ठेवायचे आहेत.परित्रत्रकाप्रमाणे मुख्याध्यापकांची जबाबदारी काही प्रमाणात कमी झाली, हे सत्य असले तरी ताण कमी झाल्याचे दिसून येत नाही. बचत गटाला पोषण आहाराचे काम दिल्याने शालेय पोषण आहाराची प्रत योग्य राहणार असून भविष्यात वादंग निर्माण होण्याच्या शक्यतेला टाळता येणार नाही. (वार्ताहर)