शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
6
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
7
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
8
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
9
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
10
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
11
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
12
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
13
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
14
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
15
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
16
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
17
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
18
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
20
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत देवरी पोलिसांची बाजी

By admin | Updated: September 24, 2016 01:49 IST

खिलाडू वृत्तीने चांगले काम केल्यास यश नक्की मिळते. जीवनात आत्मविश्वास वाढीसाठी व सकारात्मक विचारसरणीसाठी खेळ उपयुक्त ठरतात,

आमगाव दुसऱ्या क्रमांकावर : आत्मविश्वास व सकारात्मक विचारसरणीसाठी खेळ उपयुक्त- रामगावकरगोंदिया : खिलाडू वृत्तीने चांगले काम केल्यास यश नक्की मिळते. जीवनात आत्मविश्वास वाढीसाठी व सकारात्मक विचारसरणीसाठी खेळ उपयुक्त ठरतात, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी केले.जिल्हा पोलीस क्र ीडा स्पर्धा-२०१६ चा समारोप आणि बक्षीस वितरण कार्यक्रम शुक्रवारी (दि.२३) कारंजा येथील पोलीस कवायत मैदानावर डॉ.रामगावकर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते (गोंदिया), मंदार जवळे (देवरी), दिपाली खन्ना (आमगाव), परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, आयबीचे पशीने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.या तीन दिवसीत स्पर्धांमध्ये देवरी विभागाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. आमगाव द्वितीय तर तिरोडा विभाग तृतीय क्रमांकावर राहीला. चौथ्या क्रमांकावर गोंदिया मुख्यालय तर पाचव्या क्रमांकावर गोंदिया विभाग राहीला. (तालुका प्रतिनिधी)विविध स्पर्धा आणि त्यातील विजेते स्पर्धक५०० मीटर धाव (पुरूष गट) स्पर्धेत गुलाब हरिणखेडे प्रथम, कृपाण डोंगरवार द्वितीय, १००० मी. धावमध्ये शिशुपाल दमाहे प्रथम, अजय इंगळे द्वितीय, १५०० मी. धाव स्पर्धेत गुलाबचंद हरिणखेडे प्रथम, हिमेश भुजाडे द्वितीय, १५०० मी.धाव (महिला गट) रत्नकला भोयर प्रथम, ज्योती सव्वालाखे द्वितीय, ८०० मी.पुरुष- गुलाबचंद हरिणखेडे प्रथम, संजय घरतकर द्वितीय, ८०० मी. महिला- शिल्पा मते प्रथम, नितू चौधरी द्वितीय, ४०० मी.पुरुष आशिष छोेडे प्रथम, रणधीर साखरे द्वितीय, ४०० मी. महिला ज्योती बांते प्रथम, नितू चौधरी द्वितीय, २०० मी.पुरुष हितेश भुजाडे प्रथम, छगन खोटेले द्वितीय, २०० मी. महिला ज्योती बांते प्रथम, कल्पना अंबुले द्वितीय, १०० मी.रिले पुरुष आमगाव विभाग प्रथम, तिरोडा विभाग द्वितीय, १०० मी.रिले महिला गोंदिया प्रथम, गोंदिया विभाग द्वितीय, ४०० मी.रिले पुरुष तिरोडा विभाग प्रथम, आमगाव विभाग द्वितीय, ४०० मी.ईडल्स पुरुष हितेश भुजाडे प्रथम, विजय चुलपार द्वितीय, ४०० मी.ईडल्स महिला ज्योती बांते प्रथम, रत्नकला भोयर द्वितीय, १०० मी.ईडल्स पुरुष रामेश्वर राऊत प्रथम, हिमश भुजाळे द्वितीय, १०० मी.ईडल्स गायत्री बरेजू प्रथम, रत्नकला भोयर द्वितीय, १०० मीटर महिला पोलीस मुख्यालयातील ज्योती बांते प्रथम, रत्नकला भोयर द्वितीय, १०० मीटर पुरूष आमगावचे सनोज सपाटे प्रथम, तिरोडाचे छगन खोटेले द्वितीय, लांब उडी (पुरुष) राजू कासरे प्रथम, विशाल मरकाम द्वितीय, लांब उडी (महिला) ज्योती बांते प्रथम, श्यामकला भेयर द्वितीय, थाली फेक (पुरुष) जावेद प्रथम, तेजराम कावळे द्वितीय, थाली फेक (महिला) गायत्री बरेजू प्रथम, आशा मेश्राम द्वितीय, गोळा फेक (पुरुष) साकीर शेख प्रथम, महेश पाळे द्वितीय, गोळा फेक (महिला) संगीता गावळ प्रथम, गायत्री बरेजू द्वितीय, भाला फेक (पुरुष) कुलदीप डोळस प्रथम, पंकज खरवळे द्वितीय, भाला फेक (महिला) आशा मेश्राम प्रथम, स्मिता गजबे द्वितीय, उंच उडी (पुरुष) खेमराज कोरे प्रथम, राजेंद्र दमाहे द्वितीय, उंच उडी /महिला गायत्री बरजू प्रथम, श्यामकला भोयर द्वितीय, तिहरी उडी पुरुष विशाल मरकाम प्रथम, रामेश्वर राऊत द्वितीय.सांघिक खेळातील विजेता-उपविजेता चमूफुटबॉल (पुरुष) प्रथम गोंदिया, द्वितीय तिरोडा विभाग, हॅन्डबॉल (पुरुष) प्रथम देवरी विभाग, द्वितीय आमगाव विभाग, व्हॉलीबाल (पुरुष) प्रथम पो.मु.गोंदिया, द्वितीय आमगाव विभाग, व्हॉलीबॉल (महिला) प्रथम गोंदिया विभाग, द्वितीय पो.मु. गोंदिया, बास्केटबॉल (पुरुष) प्रथम देवरी विभाग, द्वितीय आमगाव विभाग,बास्केटबॉल (महिला) प्रथम गोंदिया विभाग, द्वितीय पो.मु. गोंदिया, कबड्डी (पुरुष) प्रथम आमगाव विभाग, द्वितीय देवरी विभाग, कबड्डी (महिला) प्रथम पो.मु. गोंदिया, द्वितीत गोंदिया विभाग, खो-खो (पुरुष) प्रथम तिरोडा विभाग, द्वितीय आमगाव विभाग, खोे-खो (महिला) प्रथम पो.मु. गोंदिया, द्वितीय गोंदिया विभाग, बेस्ट अ‍ॅथलेटीक्स (महिला) ज्योती बांते पो.मु.गोंदिया, बेस्ट अ‍ॅथलेटीक्स (पुरुष) हिमेश भुजाळे तिरोडा विभाग, जनरल कॅम्पयनशीप (महिला) पो.मु. गोंदिया, जनरल चॅम्पयनशीप (पुरुष) देवरी विभागाने पटकावली.