शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात धान खरेदीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:27 IST

सन २०१६-१७ यावर्षाच्या तुलनेत सन २०१७-१८ या वर्षात मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळात ९३ हजार ४६३ क्विंटल ६१ किलो धानाची कमी खरेदी झालेली आहे.

ठळक मुद्दे९३ हजार क्विंटलची घसरण : कमी पाऊस व रोगांचा परिणाम

आॅनलाईन लोकमतगोंदिया : सन २०१६-१७ यावर्षाच्या तुलनेत सन २०१७-१८ या वर्षात मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळात ९३ हजार ४६३ क्विंटल ६१ किलो धानाची कमी खरेदी झालेली आहे. जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत भीषण दुष्काळ असल्याची परिस्थिती आहे.गोंदिया जिल्हा परिषदेने ७ नोव्हेंबर २०१७ रोजी स्थायी समितीच्या सभेत तसेच ८ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेत चर्चा करुन गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करा या संदर्भात ठराव घेऊन शासनाला पाठविला होता.परंतु शासनाने गोंदिया, तिरोडा व गोरेगाव या तीन तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला. धान पिकाची कापणी झाल्यानंतर धान खरेदीसाठी शासनाकडून यंदा मार्केटीग फेडरेशनचे ५७ तर आदिवासी विकास महामंडळाचे ४१ धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते.यंदा जिल्हाभरात कमी पाऊस व मावा, तुडतुड्याचा प्रकोप असल्यामुळे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल धान कमी आले. सन २०१६-१७ या वर्षात मार्केटीग फेडरेशनने २ लाख ७९ हजार ३१६ क्विंटल धान्य खरेदी केले होते.परंतु यंदा २ लाख २ हजार ९५१ क्विंटल ६५ किलो धान खरेदी केले आहे. सन २०१६-१७ या वर्षात आदिवासी विकास महामंडळाने १ लाख १ हजार ७३९ क्विंटल धान खरेदी केले होते. तर २०१७-१८ या वर्षात ८४ हजार ६३९ क्विंटल ७४ किलो धान्य खरेदी केले आहे.सन १०१६-१७ या वर्षात मार्केटीग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाने एकूण ३ लाख ८१ हजार ५५ क्विंटल धान खरेदी केले होते. मात्र सन २०१७-१८ या वर्षात मार्केटिग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाने एकूण २ लाख ८७ हजार ५९१ क्विंटल ३९ किलो धान खरेदी केले आहे. म्हणजेच ९३ हजार ४६३ क्विंटल ६१ किलो धान कमी खरेदी करण्यात आले आहे.