शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:03 IST

जिल्ह्यात यंदा कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकंदरीत जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती असून शेतकरी संकटात आहे.

ठळक मुद्देपरिणय फुके : मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकंदरीत जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती असून शेतकरी संकटात आहे. यासर्व परिस्थितीची दखल घेत शासनाने गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून आमदार परिणय फुके यांनी केली आहे.गोंदिया जिल्ह्याची प्रत्यक्ष पीक परिस्थिती शासन निर्णयानुसार प्राप्त निकषापेक्षा वेगळी आहे. मात्र प्रत्येक्षात ती गंभीर प्रकारात मोडते. शासनाच्या निकषानुसार गोंदिया जिल्ह्याच्या वनस्पती स्थिती निर्देशांक जरी चांगल्या वर्गवारीत येत असला तरी जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी ९८ टक्के क्षेत्रावर धानाची लागवड केली जाते. मात्र यंदा पावसाअभावी धानपिक धोक्यात आले आहे. शेतकºयांनी विहीरी व बोअरवेलचा वापर करुन कशी बशी पिके वाचविली. मात्र या पिकांवर विविध कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने ८० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. कमी पावसामुळे प्रत्येक्षात शेतातील जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे त्याचा पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील देवरी, गोरेगाव, गोंदिया व तिरोडा या चार तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाची दुष्काळी स्थिती आहे. पिकाला जमिनीमध्ये असलेला ओलावा १०० टक्के पेक्षा कमी होणे म्हणजेच पुरेशा प्रमाणात पाण्याची उपलब्धता नाहीे. त्यामुळे खरीप हंगाम २०१७ पासून राज्यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार दुष्काळ जाहीर करण्याचे निकष व कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. सदर कार्यपद्धती व निकषानुसार तयार केलेले प्रपत्र अ व प्रपत्र ब नुसार गोंदिया जिल्ह्यातील खरीप २०१७ हंगामाला दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे. अशी मागणी यावेळी दिलेल्या निवेदनातून आ. फुके यांनी केली आहे. गोंदिया जिल्ह्यात ९८ टक्के क्षेत्रावर भात पिक घेतले जाते. भात पिकाला एकूण १२०० मी.मी. पाऊस आवश्यक आहे. भात पिकाला संपूर्ण कालावधीत पाणी आवश्यक असते. पण प्रत्येक्षात यंदा हलक्या धानाला रोवणीकरिता बराच विलंब झाला व त्यानंतर सलग पावसाचा खंड पडला. त्यामुळे पिके संकटात आलीे आहे. देवरी, गोरेगाव, गोंदिया व तिरोडा तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. जिल्ह्यामध्ये खरीप २०१७ मध्ये पिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात खरीप २०१७ चा हंगामात मोरगाव अर्जुनी या तालुक्यात मध्यम दुष्काळ व इतर म्हणजे गोंदिया, गोरेगाव, तिरोडा, आमगाव, सडक अर्जुनी, देवरी व सालेकसा या तालुक्याला गंभीर दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, अशी मागणी आ. डॉ. फुके यांनी केली आहे.