शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.अध्यक्षपदाचा निर्णय सोमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2022 05:00 IST

गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता ३६ दिवस पूर्ण झाले आहेत; पण अद्यापही जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन होऊन पदाधिकारी पदावर आरूढ झालेले नाही. एकूण ५३ सदस्यीय असलेल्या जिल्ह्या परिषदेत सर्वाधिक २६ जागा जिंकत भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. तर काँग्रेस १५, राष्ट्रवादी काँग्रेस ८, अपक्ष २ आणि चाबी पक्षाचे ४ सदस्य निवडून आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षणावर सोमवारी (दि.२८) निर्णय होणार आहे. या निर्णयानंतरच जिल्हा परिषद अध्यक्षाचे आरक्षण ठरणार आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यास अध्यक्षपदासाठी नव्याने रोस्टर काढण्यात येईल. तर कायम राहिल्यास गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण राहणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा निर्णय सोमवारी हाेणार आहे.गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता ३६ दिवस पूर्ण झाले आहेत; पण अद्यापही जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन होऊन पदाधिकारी पदावर आरूढ झालेले नाही. एकूण ५३ सदस्यीय असलेल्या जिल्ह्या परिषदेत सर्वाधिक २६ जागा जिंकत भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. तर काँग्रेस १५, राष्ट्रवादी काँग्रेस ८, अपक्ष २ आणि चाबी पक्षाचे ४ सदस्य निवडून आले आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी २७ सदस्यांची गरज आहे. त्यामुळे अपक्षांच्या मदतीने भाजप जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर ऐनवेळी वेगळे समीकरण झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. मात्र, सर्वांचे घोडे हे अध्यक्षपदाच्या आरक्षणाचा निर्णय न झाल्याने अडले आहे. ओबीसी आरक्षण रद्द होण्यापूर्वी जि.प. अध्यक्षपद सर्वसाधरण होते. मात्र, ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने या बदल करायचा की तेच आरक्षण ठेवायचे याबाबतचा निर्णय ग्रामविकास विभाग घेणार आहे; पण ग्रामविकास विभागाने २८ फेब्रुवारीला ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यानंतरच निर्णय घेऊ, असे जिल्हा प्रशासनाला कळविल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदाचा निर्णय सोमवारी होणार, हे स्पष्ट झाले आहे. 

ओबीसी महिला आरक्षण निघाले तर होणार जनरल- जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर व्हायचे आहे. ते ओबीसी महिला निघाल्यास रद्द होऊन सर्वसाधारण होणार आहे. कारण यापूर्वी सलग दोन जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण हे ‘ओबीसी महिला’ निघाले आहे. त्यामुळे ते रीपीट झाल्यास रद्द होऊन सर्वसाधारण होणार आहे.

...तर भाजप राहणार सत्तेबाहेर - जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप प्रबळ दावेदार असला जिल्ह्यात वेगळी खिचडी तयार होत असल्याची माहिती आहे. त्यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष आणि चाबीचे सदस्य एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी त्यांच्यात चर्चादेखील सुरू आहे. त्यामुळे हे समीकरण जुळले तर सर्वांत मोठा पक्ष असूनही भाजपला सत्तेबाहेर राहावे लागले. भाजप सुस्त अन् महाविकास आघाडी व्यस्त - जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याला घेऊन भाजपचे स्थानिक नेते सुस्त असल्याचे तर महाविकास आघाडीचे नेते जिल्हा परिषद निवडणुकीत आलेल्या अपयशावर मंथन करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.  

 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षण