शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
2
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
3
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
4
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
5
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
6
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
8
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
9
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
10
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
11
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
12
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
13
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
14
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
15
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
16
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
17
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
18
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
19
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
20
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी

आरक्षित आसनावरून उद्भवतात वाद

By admin | Updated: May 6, 2015 01:05 IST

विविध घटकांना प्रवास सुखकर व्हावा, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसमध्ये ६० पैकी तब्बल २० आसने आरक्षित केलेली आहेत.

तुमसर : विविध घटकांना प्रवास सुखकर व्हावा, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसमध्ये ६० पैकी तब्बल २० आसने आरक्षित केलेली आहेत. मात्र ठराविक घटकांसाठी आसन आरक्षित असले तरी ते आसन बसगाडी आगारातून सुटण्यापूर्वीच ताब्यात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे बस निघाल्यानंतर कोणत्याही आसनाचे आरक्षण ग्राह्य धरले जात नाहीत. पण तरीही या आरक्षित जागांवरून प्रवासादरम्यान अनेक सल्ले उपदेश सहकारी प्रवाशांकडून एकमेकांना दिले जातात. त्यातून बसमध्ये वादावादी होत असल्याचे चित्र बरेचदा पहावयास मिळते.राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसमध्ये महिलांसाठी ६, ज्येष्ठ नागरिकांसाठी ४, अपंग व्यक्तींकरिता २, स्वातंत्र्य सैनिकांसाठी २, खासदार आमदार यांच्यासाठी १, राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी यांच्यासाठी २ ाअणि वाहकासाठी १, पत्रकारांसाठी २ याप्रमाणे आसने आरक्षित केली आहेत.याबाबत बसच्या खिडकीजवळ तसेच आसनांवर उल्लेख केलेला असतो. परंतु या आसनांचे कुणी रितसर आरक्षण करताना दिसत नाही. तरीही बसमध्ये ही जागा महिलांसाठी राखीव आहे. येथे महिला उभी असताना पुरुष मात्र दिमाखात बसलेले आहेत. असे टोमणे प्रवासादरम्यान अनेकांना ऐकावयास मिळतात. पण हे आरक्षण एस.टी. बसमध्ये चढून सीटवर रुमाल टाकल्याप्रमाणे होत नाही. तर त्याकरिता प्रवाशाला निघण्यापूर्वीच या आसनांचे आरक्षण निश्चित करावे लागते किंवा बसस्थानकावर बसमध्ये चढल्यानंतर वाहकाकडून आपल्या आरक्षित जागेचे तिकीट घ्यावे लागते. स्थानकावरून बस निघाल्यानंतर दरम्यानचे स्थानक, थांबा या ठिकाणावरून या जागा आरक्षित होत नाहीत हे विशेष. प्रवासादरम्यान काही ज्येष्ठ नागरिक, महिला उभ्या असल्याचे पाहून काही प्रवासी त्यांच्या आरक्षित जागांवर बसलेल्या नियमांची माहिती नसताना नुसता आव आणताना दिसतात. (तालुका प्रतिनिधी)ंएसटी वाहक बसतात शांतदुसरीकडे मात्र दादागिरी करणाऱ्या प्रवाशांना बोलण्याची हिंमत कुणी दाखवत नाही. स्थानकावर बस लागताच खिडकीतून आतमध्ये रुमाल व सामान ठेवून त्या आसनवर आपला हक्क सांगणारे प्रवासी आहेत. राज्य परिवहन महामंडळाने प्रशासनाला आणि वाहकासोबत बसमधील प्रवाशांना हा प्रकार दिसत असताना ते मात्र शांत बसून असतात.आरक्षित जागांबाबत प्रवासी अनभिज्ञबसमध्ये आसनाच्या खिडकीजवळ जागांचे आरक्षण दिलेले असते. मात्र इतर नियम व कायद्याची माहिती ज्याप्रमाणे बसमध्ये लिहिलेली असते त्याप्रमाणे आरक्षित जागेबाबतच्या नियमांची माहिती एकाही बसमध्ये लिहिलेली नसते. त्याबाबत माहिती नसल्यामुळे या आरक्षित जागांवरून वाद उद्भवतात. बसचा संपूर्ण प्रवास कटकटीचा होऊन जातो.