शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
7
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
8
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
10
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
11
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
12
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
13
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
14
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
15
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
16
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
17
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
18
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
19
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
20
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका

शंभरी गाठतोय मृतांचा आकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 05:00 IST

जिल्ह्यात फक्त एका रूग्णापासून लागलेले कोरोनाचे ग्रहण आज ६६५९ रूग्ण संख्ये पर्यंत गेले आहे. यातील २०८७ रूग्ण आज क्रीयाशिल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. म्हणजेच, ४४७९ रूग्ण कोरोनावर मात करून आता स्वस्थ झाले आहेत. हे एक मोठे यश असून आरोग्य विभागाची कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी म्हणावी लागले. मात्र दुसरी बाजू बघितल्यास दर दिवशी मृतांचा आकडा झपाटयाने वाढत चालला आहे.

ठळक मुद्देसप्टेंबर महिन्यात कहर : दर दिवशी मृत रूग्णांची आकडेवारी चढतीच

लोकमत न्यूज नेटवर्क्नेगोंदिया : जिल्ह्यात रूग्ण संख्या झपाटयाने वाढत असल्याने आता सर्वांच्या तोंडाचे पाणी पळू लागले आहे. तर सोबतच रूग्ण बहे होऊन घरी परत जात असल्याने तेवढाच दिलासाही जिल्हावासीयांनी मिळत असल्याचे म्हणता येईल. मात्र रूग्णांची संख्या दरदिवशी चढतीच असल्याने मात्र हे धोकादायक ठरत आहे. रूग्ण बरे होऊन घरी परत जात आहेत यात आरोग्य विभागाच्या कार्याची प्रशंसा करण्याची गरज आहे. मात्र रूग्ण मृत्यूची आकडेवारी दर दिवशी वाढत चालली असल्याने मात्र प्रश्नचिन्ह उभा राहतो.जिल्ह्यात फक्त एका रूग्णापासून लागलेले कोरोनाचे ग्रहण आज ६६५९ रूग्ण संख्ये पर्यंत गेले आहे. यातील २०८७ रूग्ण आज क्रीयाशिल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. म्हणजेच, ४४७९ रूग्ण कोरोनावर मात करून आता स्वस्थ झाले आहेत. हे एक मोठे यश असून आरोग्य विभागाची कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी म्हणावी लागले. मात्र दुसरी बाजू बघितल्यास दर दिवशी मृतांचा आकडा झपाटयाने वाढत चालला आहे. ही मात्र विचार करण्यास लावणारी बाब आहे. एवढ्या मोठ्या संख्येत रूग्ण मरत असल्याने मात्र आरोग्य यंत्रणा उपचारात दुर्लक्ष करीत असल्याचेही आता जनता बोलत आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ९३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात वयोवृद्धांसोबतच युवकांचाही समावेश आहे. एकीकडे रूग्ण संख्या दररोज २००-३०० च्या घरात वाढत आहे ही गंभीर बाब आहे. मात्र रूग्ण बरे होऊन घरी परत जात असल्याने कुठेतरी जिल्हावासी दिलासा मानत आहेत. मात्र मृतांची संख्या बघता सर्वांचेच मन सुन्न होत असून धडकी भरणारी ही बाब सर्वांनाच टेन्शन देत आहे. वयोवृद्धांपासून ते युवक अशा ९३ रूग्णांना आतापर्यंत जीव गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर झालेला आघात कुणीच समजून घेऊन शकत नाही.गंभीर रूग्णांकडे विशेष लक्ष देण्याची गरजजिल्हयातील वाढता मृत्यूदर लक्षात घेत आरोग्य यंत्रणेने गंभीर रूग्णांसाठी विशेष कक्ष तयार करून त्यांना तेथेच ठेवावे. तसेच तज्ज्ञ डॉक्टर्सकडून त्यांच्यावर बारीक पाळत ठेवून उपचार द्यावे असे आता नागरिक बोलू लागले आहेत. डॉक्टरांनी कोरोनासोबतच अन्य आजारांकडे लक्ष देऊन गंभीर रूग्णांचा उपचार करणे गरजेचे असून असे केल्यास डॉक्टरांच्या प्रयत्नांपुढे कोरोना टिकणार नाही यात अनुमात्र शंका नसल्याचेही नागरिक बोलत आहेत.सप्टेंबर महिन्यात ७३ रूग्णांचा मृत्यूसप्टेंबर महिना तसा जिल्हावासीयांसाठी अशुभच ठरल्याचे दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील सर्वाधिक रूग्ण आढळून आले असतानाच मृतांचा सपाटाही याच महिन्यात सुरू झाल्याचे दिसत आहे. सप्टेंबर महिन्यातील २८ तारखेपर्यंत ७३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातही २० तारखेला ६ तर २८ तारखेला ५ रूग्णांची सर्वाधिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. तर १७ व १८ तारखेला एकही मृत्यू नसल्याने हे २ दिवस अत्यंत शुभ ठरल्याचे दिसते.मरणाऱ्यांची पोकळी कुणीच भरणार नाहीजिल्ह्यात मरण पावलेल्या ७३ रूग्णांची पोकळी ही त्यांच्या कुटुंबीयांनाच समजू शक णार आहे. मरण पावणारा आपल्या मागे भरलेले कुटुंब सोडून जातो. त्यात तो कुटुंबाचा कमावता राहिल्यास अवघे कुटुंबच रस्त्यावर येते. म्हणूनच युवा असो की वृद्ध प्रत्येकच व्यक्ती कुटुंबासाठी महत्वाचा आहे. अशात आरोग्य विभागानेही हीच बाब लक्षात रूग्णांवर उपचार करण्याची गरज आहे. कारण, आज देवाचे अवतार म्हणून अवघे जग डॉक्टरांकडेच बघत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या