शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

टागोर आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2017 03:18 IST

तिरोडा तालुक्यातील रावनघाटा मेंढा येथील रविंद्रनाथ टागोर आश्रमशाळेतील आठवीच्या विद्यार्थ्याचा

परसवाडा : तिरोडा तालुक्यातील रावनघाटा मेंढा येथील रविंद्रनाथ टागोर आश्रमशाळेतील आठवीच्या विद्यार्थ्याचा गावाजवळच्या शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.३०) उघडकीस आली. रविवारी शाळेला सुटी असतानाच ही घटना घडल्याचे सांगितले जाते. रविंद्र चैतराम टेकाम (१४) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार रविंद्र रविवारी दुपारी आपल्या तीन मित्रांसोबत अधीक्षक, शिक्षकांची नजर चुकून खेळायला बाहेर पडले. चारही विद्यार्थी खारूताईला बघण्यासाठी ठाणेगाव शिवारात तीन कि.मी. अंतरापर्यंत गेले. मात्र इकडून तिकडे धावताना शेतातील विहीर मुलांना दिसली नाही व रविंद्र सरळ विहिरीत पडला. विहीरीच्या सभोवताल उंच वाढलेले गवत होते. रविंद्र ओरडला. तीन मित्रांनी विहीरीच्या आजूबाजूला दोर पाहण्याचा प्रयत्न केला असता दोर दिसला नाही. यात रविंद्र पाण्यात बुडाला. सोबतचे मित्र प्रशांत कुवरलाल मरस्कोल्हे (१४), संजोग देवेंद्र भलावी (१४), अमित राधेशाम वाढवे (१४) हे शाळेत सायंकाळी आले पण त्यांनी ही गोष्ट शिक्षकांना सांगितली नाही. रात्रीला अधीक्षक टी.एच. बावनथडे यांनी प्राचार्य आर.आर. बघेले व विद्यार्थ्याच्या वडीलांना आसलपानी येथे फोन केला असता मुलगा घरी आला नसल्याचे त्यांनी सांगितले. अधीक्षक यांनी सर्व विद्यार्थ्यांंना विचारपूस केली, पण सोबत गेलेले विद्यार्थी घाबरले असल्याने सांगण्यास तयार नव्हते. सोमवारी सकाळी ११ वाजता प्रशांत मरस्कोल्हे यांनी प्राचार्य बघेले यांना आपबिती सांगितली. त्यानंतर शोध घेतला असता तो मुलगा विहिरीत आढळला. तिरोडा पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली. मृतक रविंद्रचे शव उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठविण्यात आले. तपास पोलीस निरीक्षक संदीप कोहळी करीत आहेत.