शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘विदर्भ’वाद्यांना डीनने लावला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:12 IST

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी दररोज विदर्भ एक्स्प्रेसने अपडाऊन करतात. परिणामी विदर्भ एक्स्प्रेस येईपर्यंत रुग्णांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत होती.

ठळक मुद्देमेडिकलमध्ये बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य : संचालकाकडे अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी दररोज विदर्भ एक्स्प्रेसने अपडाऊन करतात. परिणामी विदर्भ एक्स्प्रेस येईपर्यंत रुग्णांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. यासर्व प्रकाराची तक्रार केल्यानंतर त्याची दखल वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व्ही.पी. रुखमोडे यांनी घेत १ आॅगस्टपासून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य केले आहे. परिणामी विदर्भ एक्स्प्रेसने अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अडचण झाली असून बुधवारपासून अपडाऊनला काही प्रमाणात ब्रेक लागल्याचे चित्र आहे.गोंदिया येथील सर्व शासकीय कार्यालयांची वेळ विदर्भ एक्स्प्रेस ठरविते असे म्हटले जाते. यात वास्तविकता सुद्धा आहे. त्यामुळे बऱ्यांच शासकीय कार्यालयातील कामाकाज विदर्भ एक्स्प्रेस आल्याशिवाय सुरू होत नाही. त्याचा फटका जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना बसत होता. त्यामुळे प्रकाराबाबत रोष व्यक्त केला जात होता. मात्र महत्त्वपूर्ण सेवा समजली जाणाऱ्या आरोग्य विभागाचे डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचारी सुद्धा दररोज विदर्भ एक्स्प्रेसने अपडाऊन करतात. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व बीजीडब्ल्यू रुग्णालयात उपचारासाठी येणाºया रुग्णांना विदर्भ एक्स्प्रेस येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे बरेचदा रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या.लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व्ही.पी.रुखमोडे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ आॅगस्टपासून बायोेमेट्रिक हजेरी अनिवार्य केली.यासाठी वर्ग १ चे ६८ आणि वर्ग २ च्या १३३ कर्मचाऱ्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. बायोमेट्रिक हजेरीचा अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठविण्यात येणार आहे.वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अपडाऊन करण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी १ आॅगस्टपासून बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे. लेटलतीफ कर्मचाऱ्यांचा अहवाल कारवाईसाठी आरोग्य संचालकांकडे पाठविण्यात येईल.- व्ही.पी.रुखमोडेअधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया.

टॅग्स :Medicalवैद्यकीय