शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

प्रियकरासोबत पळून गेलेल्या विवाहितेचा मृतदेह धरणात

By admin | Updated: March 21, 2017 00:57 IST

तालुक्यातील आकोटोला येथील ३५ वर्षिय विवाहित महिला गेल्या ५ मार्चला रात्री ८.३० वाजता गावाजवळीलच ...

हत्या की आत्महत्या? : प्रियकर पोलिसांच्या ताब्यात गोरेगाव : तालुक्यातील आकोटोला येथील ३५ वर्षिय विवाहित महिला गेल्या ५ मार्चला रात्री ८.३० वाजता गावाजवळीलच घोटनटोली (मोहाडी) येथील पूरण कटरे (४० वर्ष) याच्यासोबत पळून गेल्याची तक्रार तिचा पती गोवर्धन भगत (४०) यांनी ६ मार्चला गोरेगाव पोलीस स्टेशनला केली होती. दरम्यान रविवारी (दि.१९) गावाजवळील कलपाथरी धरणाच्या पाण्यात त्या महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी प्रियकर पुरण कटरे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.प्राप्त माहितीनुसार, आकोटोला येथील सदर महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची तक्रार महिलेच्या पतीने केल्यापासून पोलिसांचा तपास सुरू केला. पण दोघांचाही पत्ता लागला नव्हता. १९ मार्च रोजी आकोटोला जवळीलच कलपाथरी धरणाच्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसले. ही माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. गावकऱ्यांनी तिथे गर्दी केली. आकोटोलाचे पोलीस पाटील यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर गोरेगाव ठाण्याचे पो.निरीक्षक सुरेश कदम यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. तलावातील मृतदेह घोटनटोली निवासी पुरण कटरे याच्यासोबत पळून गेलेल्या महिलेचाच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर १९ मार्चच्या रात्री ८.३० वाजता पोलिसांनी पुरण कटरेला ताब्यात घेतले. त्या महिलेची हत्या की आत्महत्या याबाबतची चौकशी पोलीस उपनिरीक्षक नलावडे, गणवीर करीत आहे. (शहर प्रतिनिधी)मृतदेह ४ दिवस पाण्यातचपाण्यात असलेला मृतदेह काढण्यासाठी ढिवर समाजातील लोकांना बोटीसह पाचारण केले. मृत महिलेच्या अंगावर साडी व फाटलेले ब्लाऊज आढळले. हा मृतदेह ४ ते ५ दिवसापूर्वीचा असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. मृतदेहाचे मांस, केस गळालेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळीच डॉक्टरच्या चमूला बोलावून शवविच्छेदन करण्यात आले. हा मृतदेह नातेवाईकांनी घेण्यास नकार दिल्याने त्याच ठिकाणी पोलिसांनी अंतिम संस्कार केले.