शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यातील अंगणवाडी पोषक आहारात वटवाघुळाचे मृत पिल्लू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 15:19 IST

अंगणवाडी केंद्रातून गर्भवती महिला आणि किशोरवयीन मुलींना पोषक आहाराच्या पाकिटचे वाटप केले जाते. या पोषक आहाराच्या मसूरडाळीच्या पाकिटात मृत वटवाघूळाचे पिल्लू आढळल्याची घटना गुरूवारी (दि.१८) सालेकसा तालुक्यातील बिजेपार येथे सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देबिजेपार येथील घटनापोषक आहारावर प्रश्नचिन्ह

गोंदिया : अंगणवाडी केंद्रातून गर्भवती महिला आणि किशोरवयीन मुलींना पोषक आहाराच्या पाकिटचे वाटप केले जाते. या पोषक आहाराच्या मसूरडाळीच्या पाकिटात मृत वटवाघूळाचे पिल्लू आढळल्याची घटना गुरूवारी (दि.१८) सालेकसा तालुक्यातील बिजेपार येथे सकाळी उघडकीस आली.प्राप्त माहितीनुसार बिजेपार येथील मायरा सचिन वाघमारे या मुलीला आठ दिवसांपूर्वी स्थानिक अंगणवाडीतून सीलबंद मसूरडाळीचे पाकिट देण्यात आले. ते फोडले असता आत मृत वटवाघुळाचे पिल्लू आढळले. या प्रकारामुळे मायराच्या कुटुंबीयांना चांगलाच धक्का बसला. त्यांनी लगेच याप्रकाराची माहिती जि.प.महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे आणि सालेकसा पंचायत समितीचे सभापती दिलीप वाघमारे यांना दिली. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन मसुरडाळीचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाही करण्यात येईल असे सांगितले.मात्र यामुळे पुन्हा अंगणवाडीतून वितरीत केल्या जाणाºया पोषक आहारावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. पोषक आहाराच्या माध्यमातून आरोग्य सदृढ होण्याऐवजी उलट आरोग्य धोक्यात येत असल्याचे चित्र आहे. अंगणवाडीतून वितरीत करण्यात येणाºया पोषक आहाराच्या पाकिटात कधी मृत पाल तर कधी अळ्या लागलेला रवा आणि इतर साहित्य आढळल्याच्या घटना यापूर्वी सुध्दा उघडकीस आल्या आहेत. मात्र यानंतरही पोषक आहाराचे पाकीट तयार करताना आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याचे बिजेपार येथील घटनेनंतर स्पष्ट झाले आहे.हा तर महिला, मुलींच्या आरोग्याशी खेळमहिला व बालविकास विभागाद्वारे अंगणवाडीतील चिमुकले, गर्भवती महिला व किशोरवयीन मुलींचे आरोग्य सदृढ राहावे उत्तम आरोग्य राहावे यासाठी अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून पोषक आहाराचे नि:शुल्क वाटप केले जाते. मात्र त्याच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हा तर महिला आणि मुलींच्या आरोग्याशी एकप्रकारचा खेळ असल्याचे मायराचे वडील सचिन वाघमारे यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणीअंगणवाडी केंद्रातून पुरवठा करण्यात आलेल्या मसुरडाळीच्या पाकीटात मृत वटवाघुळाचे पिल्लू आढळले. त्यामुळे अंगणवाड्यांना पोषक आहाराचा पुरवठा करणाºया संबंधित कंत्राटदारावर कारवाही करण्याची मागणी बिजेपार येथील गावकऱ्यांनी केली आहे.अंगणवाडी केंद्रातून वितरीत करण्यात आलेल्या मसुरडाळीच्या पाकिटात मृत वटवाघुळाचे पिल्लू आढळल्याचा प्रकार गंभीर आहे. याप्रकरणाची चौकशी करुन संबंधित कंत्राटदारावर निश्चितच कारवाही केली जाईल.- दिलीप वाघमारे, पं.स.उपसभापती सालेकसा.

टॅग्स :foodअन्नGovernmentसरकार