शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

डीसीपीएस कपातीचा हिशेब मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 21:27 IST

१ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना १९८२ ची निवृत्ती वेतन योजना बंद करुन शासनाने अंशदायी पेन्शन योजना (डीसीपीएस) सुरु केली.

ठळक मुद्देपाच वर्षे लोटली : जुनी पेंशन हक्क संघटनेचे जिल्हा उपलेखाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : १ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना १९८२ ची निवृत्ती वेतन योजना बंद करुन शासनाने अंशदायी पेन्शन योजना (डीसीपीएस) सुरु केली. मात्र मागील पाच वर्षांपासून या योजनेतील कपातीचा हिशेबच मिळत नसल्याचा आरोप जुनी पेंशन हक्क संघटनेने केला आहे.डीसीपीएस खाते क्रमांक सन २०१२ मध्ये कर्मचाऱ्यांना शासनामार्फत वितरित करण्यात आले. योजना लागू झाल्यानंतर तब्बल सात वर्षानंतर खाते मिळाले. तरी पण कधी कपात सुरु व कधी कपात बंद, असा नित्यक्रम शिक्षकांसोबत सुरु आहे. शिक्षकांची अंशदायी पेन्शनची कपात २०१२ ते २०१४ पर्यंत सुरु होती. त्यानंतर २०१४ ते २०१६ पर्यंत कपात पुन्हा बंद करण्यात आली. पुन्हा मे २०१६ पासून कपात सुरु करण्यात आली.प्रतिशिक्षक आतापर्यंत किती कपात झाली आहे, हे जाणून घेण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाºयांनी वित्तविभाग, शिक्षण विभागाच्या मागील दोन वर्षांपासून अनेक चकरा मारल्या. मात्र कपातीची पावती कुणीही अधिकारी शिक्षकांना द्यायला तयार नाही.आपल्या कपातीची रक्कम सुरक्षित आहे की नाही, अशी शंका शिक्षकांच्या मनात निर्माण होत आहे. तसेच सदर योजना कोणत्याही कर्मचाºयाला पसंत नाही. परंतु निदान झालेली कपात तरी सुरक्षित असावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.मागील पाच वर्षांच्या कपातीचा हिशोब मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संटघनेच्या वतीने जिल्हा उपलेखाधिकारी काकडे यांना निवेदन देण्यात आले आहे.निवेदन देताना संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र कडव, सचिव सचिन राठोड, सहकार्याध्यक्ष मुकेश रहांगडाले, तालुकाध्यक्ष शीतल कनपटे, भूषण लोहारे, तालुका सचिव अनमोल उके, शालिक कठाणे व अजय तितिरमारे, अमोल खंडाईत, संजय उके, भूमेश्वर कटरे, सुनील चौरागडे आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.