शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

अंधारातील घरांना मिळणार ‘ज्योती’

By admin | Updated: October 24, 2016 00:46 IST

अद्याप वीज जोडणी न मिळालेल्या दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांच्या घरातील अंधार दूर सारण्यासाठी

दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना : २१ हजार बीपीएल लाभार्थ्यांना मिळणार लाभगोंदिया : अद्याप वीज जोडणी न मिळालेल्या दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांच्या घरातील अंधार दूर सारण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना राबविली जाणार आहे. परिमंडळातील गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील २१ हजार १७६ बीपीएल लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून महावितरणच्या माध्यमातून त्यांच्या घरातही हक्काची ज्योत पेटणार आहे. जग बदलत चालले असून नवनवीन तंत्रज्ञान आले आहे. पैसा खर्च करून विविध सुख सोयीच्या वस्तू घेता येतात व नागरिकांना त्यांची सवय लागली आहे. मात्र असे असताना आजही कित्येकांच्या घरात वीज पोहोचलेली नाही. अंधारातच त्यांना आजही आपले दिवस-रात्र काढावे लागत असल्याचे वास्तव आहे. वीज जोडणी घेण्या इतपत त्यांच्याकडे पैसा नसल्यामुळे ते यापासून वंचीत आहे. अशाच घटकाच्या घरात वीज पोहोचावी यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असून दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना यातून तयार झाली आहे. ग्रामीण व शहरी भागात अखंडीत व दर्जेदार वीज सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशातून केंद्र शासनाची दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना राबविली जात आहे. वीज जोडणी नसलेल्या बीपीएल गटातील नागरिकांच्या घरातील अंधार दूर करण्यासाठी व त्यांना हक्काचे कनेक्शन देता यावे यासाठी ही योजना राबविली जात आहे. यांतर्गत परिमंडळांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील १७ हजार ४११ तर भंडारा जिल्ह्यातील तीन हजार ७६५ लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा दिला जाणार आहे. विशेष म्हणजे या कामांना मंजूरी मिळाली असून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कामाचे आदेश दिल्यानंतर या योजनेतर्गत बीपीएल घटकातील लाभार्थ्यांना वीज जोडणी दिली जाणार आहे. असे झाल्यास त्यांना आता अंधारात रहावे लागणार नाही. याकरिता परिमंडळासाठी ७२६८.२८ लाख रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.(शहर प्रतिनिधी)