शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मलेरियाच्या संसर्गाचा हॉटस्पॉट होतोय दरेकसा परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:00 IST

सालेकसा तालुका जिल्ह्याच्या पूर्र्व टोकावर असून या तालुक्याला इतर दोन राज्याच्या सीमा लागून आहे. हा भाग जंगल व्याप्त असल्याने दरवर्षी या भागात मलेरियाचा उद्रेक होतो. तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्रातून लोकांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करीत असतात. या अंतर्गत एप्रिल ते जुलै २०२० या कालावधीत तालुक्यात एकूण १७ हजार ३४० रुग्णाचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.

ठळक मुद्देमुरकुटडोह दंडारी संसर्गाचे प्रवेशद्वार : ८० टक्के रुग्ण दरेकसा येथे, उपाययोजनांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील दरेकसा परिसर आता मलेरियाचा माहेरघर ठरु लागला आहे. परंतु याच्या मुळाशी जाऊन उपाययोजना करीत मलेरियाचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभाग अपयशी ठरताना दिसत आहे.सालेकसा तालुका जिल्ह्याच्या पूर्र्व टोकावर असून या तालुक्याला इतर दोन राज्याच्या सीमा लागून आहे. हा भाग जंगल व्याप्त असल्याने दरवर्षी या भागात मलेरियाचा उद्रेक होतो. तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्रातून लोकांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करीत असतात. या अंतर्गत एप्रिल ते जुलै २०२० या कालावधीत तालुक्यात एकूण १७ हजार ३४० रुग्णाचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी एकूण ६१ नमुने मलेरिया पॉझिटिव्ह आले. यापैकी तब्बल ४८ रुग्ण एकट्या दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत आढळले. उर्वरित १३ रुग्ण इतर तीन प्राथमिक आरोग्य केंद्रात सापडले आहेत. तालुक्यातील एकूण मलेरियाच्या रुग्णापैकी ८० टक्के रुग्ण दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळले आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय विचार केला तर मागील चार महिन्यात प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध येथे एकूण तीन हजार ४४४ रुग्णांचे मलेरिया तपासणी करण्यात आली. त्यापैकी फक्त पाच रुग्ण मलेरिया पॉझिटिव्ह निघाले. सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन हजार १६४ लोकांचे रक्त नमुने घेण्यात आले. त्यापैकी फक्त एकच मलेरिया रुग्ण आढळला. बिजेपार प्राथमिक आरोग्य केंद्रात चार हजार २८८ लोकांचे रक्त नमुने तपासण्यात आले. त्यापैकी केवळ सात रुग्ण मलेरिया पॉझिटिव्ह आढळले. दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण सात हजार ४४४ लोकांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी ४८ रुग्ण मलेरिया पॉझिटिव्ह सापडले. विशेष म्हणजे जुलै महिन्यात तब्बल ३८ मलेरिया रुग्ण दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात सापडले आहेत. त्याहून अधिक आश्चर्य आणि चिंतेची बाब म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण सहा उपकेंद्राचा समावेश आहे.जुलै महिन्यात सापडलेल्या ३८ मलेरिया रुग्णांपैकी दरेकसा उपकेंद्रामध्ये २६ मलेरिया रुग्ण सापडले.उर्वरित १२ रुग्ण इतर एकूण पाच उपकेंद्रात आढळले. जानेवारी ते जुलै महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात एकूण १५० रुग्ण त्यापैकी तब्बल ५२ रुग्ण एकट्या दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात सापडले. त्यातच ३२ मलेरिया रुग्ण उपकेंद्र दरेकसा येथे सापडले अर्थात ३५ टक्के मलेरिया रुग्ण एकट्या दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळले आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात दरेकसा परिसरात दरवर्षी मलेरियाचे रुग्ण सापडत असून सुद्धा आरोग्य विभागातर्फे उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे या भागाकडे पूर्णपण दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.मुरकुटडोह दंडारी संसर्गाचे प्रवेशद्वारमुरकुटडोह दंडारी हे गाव मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर असून सीमेपलिकडे कट्टीपार, कटेमा आणि काही इतर छोटे छोटे गाव घनदाट जंगलात आहेत. त्या गावातील लोक नेहमी मुरकुटडोह दंडारी येथील आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी ये-जा करीत असतात. प्रकृती बिघडल्यास सुद्धा ते आरोग्य केंद्रात येण्यासाठी या गावांमध्ये येऊन थांबतात. त्यामुळे सुध्दा मलेरियाचा संसर्ग वाढतो.दरेकसा उपकेंद्रात सर्वाधिक रुग्ण कसे?प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा हे जमाकुडो परिसरात असून दरेकसा नावाचे कोणते गाव अस्तित्वात नाही. परंतु दरेकसा ग्रामपंचायत अस्तित्वात असून या ग्रामपंचायतीमध्ये डहाराटोला,बंजारी, दलदलकुही आणि मुरकुटडोह दंडारीच्या पाच गावांचा समावेश आहे. या गावांचाच समावेश दरेकसा उपकेंद्रात करण्यात आला आहे. मुरकुटडोह दंडारी परिसरात दरवर्षी मलेरिया रुग्ण आढळतात. जेव्हा येथील लोकांना अस्वस्थ वाटते तेव्हा ते दरेकसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचार करण्यासाठी जातात. परंतु दरेकसापासून १५ ते २० कि.मी. अंतरावर असलेल्या या गावातील लोकांना एका दिवसात पायी चालून औषधोपचारासाठी पोहोचणे शक्य नसते. अशात हे लोक मधातच दलदल कुही, धनेगाव, डहाराटोला इत्यादी गावामध्ये आपल्या नातेवाईकांकडे येऊन रात्रभर थांबतात. त्यांच्या सहवासात आल्यावर मलेरियाग्रस्त व्यक्तीला चावणारा हवाकुलीस नावाचा मादी डास इतर दुसऱ्या व्यक्तीला चावल्यावर त्या व्यक्तीलाही हिवतापाचा संसर्ग होतो. यामुळे या भागात सर्वाधिक रुग्ण आढळतात.

टॅग्स :Healthआरोग्य