शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यावर घोंघावतेय पुन्हा दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 22, 2016 00:09 IST

यावर्षी जिल्ह्यात दमदार पर्जन्यवृष्टी झाली नाही. धरण, नदी, नाले, तलावात पाणी नाही. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास यावर्षी

पावसाचे प्रमाण कमी : धरण, तलाव यावर्षीही राहणार तहानलेलेच?संतोष बुकावन अर्जुनी-मोरगावयावर्षी जिल्ह्यात दमदार पर्जन्यवृष्टी झाली नाही. धरण, नदी, नाले, तलावात पाणी नाही. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास यावर्षी निश्चितपणे दुष्काळाचा सामना करावा लागण्याची बिकट अवस्था दिसत आहे. धान रोप फुटवे अवस्थेत असताना साधारणपणे आॅगस्ट महिन्यात ४३६ मिमी पावसाची आवश्यकता असते. मात्र त्या तुलनेत ५० टक्यांपेक्षा कमी पाऊस असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. परंतू हे धरण अर्धेही भरलेले नाही. केवळ ४७.२६ टक्के एवढा जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या तीन वर्षात, म्हमजे ५ सप्टेंबर २०१३ नंतर हे धरण ‘ओव्हरफ्लो’ झालेच नाही. या परिसरातील शेतकरी एकतर निसर्ग किंवा या धरणावर पूर्णपणे अवलंबून आहेत. धरणाची लघुतम पातळी ८१० फूट, उच्चतम ८३८.६० फूट आहे. आजघडीला धरणात ८२७.७० फूट जलसाठा आहे. आगामी काळात खरीपाचे पीक निघण्यासाठी कालव्यांद्वारे पाणी सोडावेच लागणार आहे. एका महिन्याला सिंचनासाठी साधारणत धरणातील ५ फूट पाण्याची गरज भासते. आॅक्टोबर महिन्याअखेरपर्यंत शेतकऱ्यांना सिंचनाखाली पाणी उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. अशा परिस्थितीत धरणातील पाणी खर्च होईल. ८१५ फूट हा राखीव पाणीसाठा जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्रांतर्गत असतो. याशिवाय या धरणावर महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाची अर्जुनी-मोरगाव पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. यासाठी ३.०७२ दलघमी पाण्याची आवश्यकता असते. आगामी उर्वरीत नक्षत्रात दमदार पाऊस झाला नाही तर जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो. दरवर्षी जिल्ह्यात १३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस होतो. यावर्षीची स्थिती मात्र दयनीय आहे. धरणाच्या पाण्याने खरीप हंगाम कसाबसा निघेल मात्र रबी हंगाम, उन्हाळी पीक, पिण्याचे पाणी, जनावरे, वन्यप्राण्यांसाठी जलसंकट उद्भवण्याची चिन्हे आहेत. सध्या मान्सूनची मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त ही नक्षत्रे शिल्लक आहेत. या नक्षत्रात पावसाचे प्रमाण कमी असते. चित्र व स्वाती या नक्षत्रात अनियमित पाऊस होतो. त्यामुळे यंदाचा मान्सून सरासरी गाठण्याची शक्यता धूसर आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास तिरोडा तालुक्यात पावसाचे प्रमाण ९२.९ टक्के असल्याचे दिसते. तिथे गतवर्षी पेक्षा पाऊस जास्त आहे. सर्वात कमी पाऊस अर्जुनी-मोरगाव तालुक्यात पडला. या तालुक्यात पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत केवळ ५८.६ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत या तालुक्यात १०९ मिमी कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात १९ आॅगस्टपर्यंत सरासरीनुसार ९५६.१ मिमी पाऊस हवा होता. मात्र प्रत्यक्षात ६९० मिमी पडला आहे. म्हणजे तब्बल २६६ मिमी पावसाचे प्रमाण कमी आहे. गतवर्षी आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात दमदार पर्जन्यवृष्टी झाल्याने सरासरी गाठता आली. मात्र यावर्षी तशी लक्षणे दिसून येत नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात गेल्या १९ दिवसात केवळ ८७.८ मिमी पर्जन्यवृष्टी झाली हे विशेष.