शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घाणीच्या साम्राज्याने वनचौकी धोकादायक

By admin | Updated: September 29, 2016 00:21 IST

नगरातील आंबेडकर चौकाशेजारी असलेल्या वनचौकीच्या मागे मोठ्या प्रमाणात संपूर्ण पावसाळ्याचे पाणी साचले आहे.

कुंभारटोली ग्रामपंचायतचे दुर्लक्ष : साचलेल्या पाण्यातून दुर्गंधीआमगाव : नगरातील आंबेडकर चौकाशेजारी असलेल्या वनचौकीच्या मागे मोठ्या प्रमाणात संपूर्ण पावसाळ्याचे पाणी साचले आहे. साचलेले पाणी निळे झाले. पाण्याची दुर्गंधी येत आहे. मात्र ग्रामपंचायत कुंभारटोली पाणी काढण्याकरिता जे उपाय पाहिजे ते करीत नसल्याचे गली शेजारील अनेक नागरिकांनी आरोप केला आहे.आंबेडकर चौकाकडून रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या डाव्या बाजूला अनेकांचे अनेक व्यवसाय सुरू आहेत. मात्र या दुकानाच्या मागे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सदर पाणी निळे झाले आहे. अनेक दुर्गंधी युक्त सामान पाण्यात असल्याने आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. बस चौकीच्या मागील परिसर जरी शासकीय असला तरी पाण्याचा निकास करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. सदर परिसर ग्रामपंचायत कुंभारटोली अंतर्गत येत आहे. साचलेले पाणी जाण्यास प्रशस्त मार्ग नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व रोहयोच्या सहकार्याने ही व्यवस्था होणे गरजेचे आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागात कोण अधिकारी किंवा कोण कर्मचारी हे शोधणे कठिण झाले आहे. सततच्या पावसाने अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. मात्र पडलेल्या खड्यांना बुजविण्याकरिता कुणीही पुढाकार घेताना दिसत नाही. वन चौकीच्या मागे साचलेल्या पाण्याची दुर्गंधी येणे सुरू झाले आहे. तेथून देवरी मार्गावर उजव्या बाजूला अनेक अतिक्रमण धारकांचे दुकान आहेत. त्यामागेसुद्धा मोठ्या प्रमाणात कचरा पडला आहे. पडलेला कचरा पाण्याने कुजला असून त्याचीसुद्धा दुर्गंधी येत आहे. मात्र ग्रामपंचायत कुंभारटोली व सार्वजनिक बांधकाम विभाग रोहयो या समस्येच्या निराकरणासाठी प्रयत्नशील नसल्याने नागरिकांत व्यापक असंतोष निर्माण झाला आहे. त्वरित उपाययोजना करण्याची मागणी अनेकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)