शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:57 IST

येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत पूर्णत: जीर्ण झाली आहे. ही केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देजि.प. शाळेची इमारत जीर्ण : नवीन इमारतीचे बांधकाम मंजूर करा

लोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत पूर्णत: जीर्ण झाली आहे. ही केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या जीर्ण इमारतीत बसून शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आल्याचे चित्र आहे.मागील पाच वर्षांपासून ही इमारत दुरूस्त करण्यात आलेली नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून इमारत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नवीन इमारत बांधकामाची मागणी पालक व नागरिकांनी केली आहे.सध्या पावसाळा सुरू असून जीर्ण इमारती या कालावधीत कोसळतात. येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत देखील जीर्ण झाली असल्याने शाळेच्या परिसरात वावरणाºया विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. सौंदड येथील जिल्हा परिषदेची इमारत मागील पाच वर्षांपासून जीर्णावस्थेत आहे. काही वर्षापूर्वी दोन वर्गखोल्यांचे नविनीकरण करण्यात आले होते. पैसा बचाव कार्यक्रम असल्याने सदर दोन्ही वर्गखोल्या सध्या भंगारावस्थेत आहेत. पाऊस आल्यास या वर्गखोल्या गळत असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना दुसरीकडे बसवावे लागते. सदर दोन्ही वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्याची मागणी मुख्याध्यापक ई.के. मडावी व शाळा समितीने केली आहे. याशिवाय प्रयोगशाळेची जीर्ण झालेली इमारत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने पाडून त्या ठिकाणी नविन इमारत बांधण्याची मागणी आहे. त्यामुळे भविष्यात होणारे अपघात टळू शकतील. येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये एकूण पाचवी ते दहावीपर्यंत एकूण ३३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याच शाळेजवळ एक दुसरी जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा असून पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. ती इमारतसुद्धा जीर्ण झाली आहे.मागील अनेक वर्षांपासून सदर इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे भविष्यात होणारे अपघात टाळण्यासाठी आताच उपाय योजना करण्याची गरज आहे.- रमेश चुºहेजि.प.सदस्य, गोंदिया