शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जिल्ह्यातील ७८ गावांना पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 23:23 IST

सन २०१९ च्या पावसाळ्यात किती गावांना पुराचा धोका आहे. याचा आढावा घेतांना जिल्ह्यातील चार धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठालगतच्या ७८ गावांना पुराचा फटका बसू शकतो असे दिसून आले आहे. पूर परिस्थितीत या गावांना सतर्क राहण्यासाठी वेळीच उपाय योजना करता याव्या यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.

ठळक मुद्देआमगाव तालुक्यातील गावे सर्वाधिक : संजय सरोवरातील पाण्यामुळे निर्माण होते पूर परिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सन २०१९ च्या पावसाळ्यात किती गावांना पुराचा धोका आहे. याचा आढावा घेतांना जिल्ह्यातील चार धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठालगतच्या ७८ गावांना पुराचा फटका बसू शकतो असे दिसून आले आहे. पूर परिस्थितीत या गावांना सतर्क राहण्यासाठी वेळीच उपाय योजना करता याव्या यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागाच्यावतीने सिरपूरबांध, कालीसरार, पुजारीटोला व इटीयाडोह या चार प्रकल्पांची कामे बघितली जातात. मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर बांधण्यात आलेल्या सिरपूरबांध व कालीसरार धरणात पाणी साठविण्यात येते. पूर परिस्थिती पाहता आवश्यकतेनुसार या दोन धरणातील पाणी पुजारीटोला धरणात सोडले जाते. पूर नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने या धरणातून पाणी सोडले जाते. गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी पाच तालुक्यांतील ७८ गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.त्यात गोंदिया, अर्जुनी-मोरगाव व देवरी या तीन तालुक्यातील प्रत्येकी १३ अशी ३९ गावे, सालेकसा तालुक्यातील १९ गावे व आमगाव तालुक्यातील २० गावांना धोका आहे. गोंदिया जिल्ह्यातून वाहणारी बाघनदी ही वैनगंगा नदीची उपनदी असल्यामुळे बाघ नदीच्या खालच्या भागात लवकरच पूर परिस्थिती निर्माण होते. मध्यप्रदेश राज्यातील सिवनी जिल्ह्यात वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेला संजय सरोवर (भिमगड प्रकल्प) पाण्याने भरल्यानंतर पूर परिस्थिती लक्षात घेता तेथीलही पाण्याचा विसर्ग केला जातो. त्यामुळे गोंदिया तालुक्यातील १३ गावांना पूर परिस्थितीचा धोका असतो.रजेगावच्या पुलाची खोली २८० मीटरगोंदिया-बालाघाट या आंतरराज्यीय मार्गावर रजेगाव येथील जुन्या पुलाची खोली २८० मीटर आहे. या ठिकाणी पुराचा निर्माण धोका होऊ नये तसेच वैनगंगा नदीवरील देवरी, नवेगाव, धापेवाडा येथील पूर परिस्थतीची माहिती प्रशासन वेळोवेळी घेत असते.या गावांना पुराचा धोकादेवरी : ग्राम सिरपूर, शिलापूर, पदमपूर, बोरगाव बाजार, वडेगाव, पुराडा, कारूटोला, लोहारा, मकरधोकडा, लबानधारणी, हलबीटोला, भोयरटोला व ढिवरीनटोला (१३ गावे).सालेकसा : ग्राम मूरपार, केहरीटोला, नदीटोला, म्हशीटोला, पंढरपूर, नवाटोला, हलबीटोला, शेरपार, तिरखेडी, भाडीपार, बोदलबोडी, सावंगी, पिपरटोला, झालीया, घोन्सी, महाजनटोला, भाडीपार, मरारटोला, चिचटोला (१९ गावे)आमगाव : ग्राम माल्ही, धामनगाव, सरकारटोला, ननसरी, मुंडीपार, माल्हीटोली, शंभूटोला, महारीटोला, मोहनटोला, साकरीटोला, गोंडीटोला, मनेकसा, गिरोला, घाटटेमनी, बनियाटोला, बनगाव, ढिमरटोला, खैरीटोला, नागोटोला, जंगीटोला (२० गावे).गोंदिया : ग्राम छिपीया, कटंगटोला, वडेगाव, कोचेवाही, बनाथर, धामनगाव, सतोना, कोरणी, बिरसोला, बरगावटोला, बुधुटोला, जिरूटोला, नांद्याटोला (१३ गावे)अर्जुनी-मोरगाव : ग्राम सुरबन, बोंडगाव, चिचोली, करांडली, खोकरी, दिनकरनगर, पुष्पनगर (अ), पुष्पनगर (ब), जरूघाटा, वडेगावबंध्या, सावरी, बोरी, बोडदा (१३ गावे).

टॅग्स :floodपूर