शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे उपविभागाची वीज कापली

By admin | Updated: July 21, 2016 01:15 IST

लघु पाटबंधारे उपविभाग भंडारा या कार्यालयाची विद्युत जोडणी मागील आठवड्यात कापण्यात आली.

कंत्राटदारांचे देयके रखडले : भंडारा लघु पाटबंधारे विभागातील प्रकार, आठ दिवसांपासून अंधारात भंडारा : लघु पाटबंधारे उपविभाग भंडारा या कार्यालयाची विद्युत जोडणी मागील आठवड्यात कापण्यात आली. आज आठ दिवसांचा कालावधी लोटला असतानाही विद्युत जोडणी पुर्ववत करण्यात आली नाही. यामुळे या कार्यालयांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटदारांचे लाखोंचे देयके रखडल्याची बाब समोर आली आहे. जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता यांच्या अधिनस्थ असलेल्या भंडारा लघु पाटबंधारे उपविभागाचे कार्यालय जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या बंगल्याशेजारी आहे. या कार्यालयात स्वत:चे विद्युत मिटर नाही. मागील अनेक वर्षांपासून या कार्यालयाला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. मात्र विद्युत पुरवठ्यात तांत्रिक अडचणी निर्माण होत नव्हता. त्यामुळे येथील उपविभागीय अभियंता यांनी शासकीय कामांची अडचण निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी लगतच्या डिआरडीए विभागाकडून काही दिवसांपूर्वी वीज जोडणी घेतली होती. सुमारे महिनाभरापूर्वी डीआरडीएने या कार्यालयाला विद्युत जोडणी करून तात्पुरता वीज पुरवठा सुरु केला होता. मात्र या विभागानेही १३ जुलैला कुठलीही पूर्व सूचना न देता या उपविभागीय कार्यालयाला करण्यात आलेला विद्युत पुरवठा अचानकपणे खंडीत केला. यामुळे मागील आठवडाभरापासून या कार्यालयात वीज जोडणीअभावी महत्वाची शासकीय कामे रखडली आहेत. कार्यालयाला सुरु असलेला विद्युत पुरवठा अचानकपणे बंद करण्यात आला. दुसरीकडे शुक्रवारपासुन लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांनी लेखनीबंद आंदोलन उभारले आहे. यात लघु पाटबंधारे उपविभागातील लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. यामुळे या विभागाचे कामकाज पुर्णपणे ठप्प झाले आहे. शासनाच्या निर्देशानुसार जलयुक्त शिवाराची महत्वाची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र याबाबत आता विद्युत जोडणी होईपर्यंत या विभागांतर्गत करण्यात आलेल्या कामाची माहिती शासनाला देण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने या विभागाची विद्युत जोडणी सुरु केल्यास अडचणी दूर होऊ शकते. (शहर प्रतिनिधी)