शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांनी केले धान पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 05:00 IST

धानाला फुटवे फुटण्याअगोदरच रानगव्यांनी अंदाजे दहा एकरातील धानाची नासाडी करून शेतकऱ्यांचे नुकसान केले. यामुळे शेतकऱ्यांना हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. या परिसरातील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन शेतीवरच अवलंबून आहे. सर्वांकडे स्वत:ची सिंचनाची सोय असल्याने खरीप व रब्बी धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) :  सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा व कोहळीपार शेतशिवारात अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी रब्बी  धानाची लागवड केली आहे. शेतीला लागूनच जंगल असल्याने वन्य प्राण्यांचा सतत वावर असतो. त्यामुळे पिकांचे वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. परिणामी शेतकरी अडचणीत आले आहे. तालुक्यातील कोहळीपार शिवारातील शेतकरी धनलाल मानवटकर, रवींद्र बावनकुळे, कुंडलिक मानवटकर, देवराम मानवटकर, कृष्णा बावनकुळे, संजय बावनकुळे, विजय मानवटकर, विनायक गोस्वामी, सदाराम बावनकुळे, भागवत पंधरे व अन्य शेतकऱ्यांनी १५ दिवसांपूर्वी रब्बी धानाची लागवड केली होती. धानाला फुटवे फुटण्याअगोदरच रानगव्यांनी अंदाजे दहा एकरातील धानाची नासाडी करून शेतकऱ्यांचे नुकसान केले. यामुळे शेतकऱ्यांना हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. या परिसरातील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन शेतीवरच अवलंबून आहे. सर्वांकडे स्वत:ची सिंचनाची सोय असल्याने खरीप व रब्बी धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खरीप हंगामात नैसर्गिक संकटामुळे धानाच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. मात्र यानंतरही शेतकऱ्यांनी खचून न जाता हिम्मत करून शेती केली; पण वन्यप्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे. त्यामुळे वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे लेखी निवेदन क्षेत्र सहायक फिरोज खॉ पठाण यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीforest departmentवनविभाग