शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने धान पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2017 00:20 IST

उन्हाळी रबी धानपीक शेतकऱ्यांच्या हातात येण्याच्या स्थितीवर असताना ७ मे रोजी रात्रीच्या वेळी आलेल्या पाऊस व वादळामुळे

बळीराजा चिंताग्रस्त : नुकसानभरपाईची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क केशोरी : उन्हाळी रबी धानपीक शेतकऱ्यांच्या हातात येण्याच्या स्थितीवर असताना ७ मे रोजी रात्रीच्या वेळी आलेल्या पाऊस व वादळामुळे धानपीक खाली पडून धान झडल्यामुळे आणि कापणी झालेल्या धानावर पाणी गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने या परिसरात झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी चेतन दहीकर, योगेश नाकाडे, सुशील गहाणे, विलास गायकवाड यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे या परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्याच्या उन्हाळी धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे या भागातील बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. धान पिकाचे चांगले उत्पन्न आपल्या हाती लागेल आणि बँकाचे कर्ज सहजरित्या फेडता येईल, अशी आशा ठेवून नियोजनात शेतकरी वर्ग असताना वादळ व पावसामुळे धानपिकांचे नुकसान झाले. त्यामुळे कर्ज कसे फेडावे या विवचनेत शेतकरी वर्ग दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांचे धान पीक खाली पडून झडले आहेत. काही शेतकऱ्यांची कापणी होवून पीक पावसात ओले झाल्याने योग्य धानाची प्रत हाती लागणार नसल्याने चांगल्या भावात धान विकता येणार नाही. या चिंतेने शेतकरी पार खचून गेले आहेत. यापूर्वी झालेल्या नुकसानीचे शासनाने सर्वेक्षण करुन तुटपुंज्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत केली. धान पिकविण्यासाठी शेतकरी जीवाची पर्वा न करता रात्री बेरात्री शेतावर जावून पिकांची काळजी घेतात. अशावेळी शासनाने योग्य मदत दिली नाही तर शेतकऱ्यांची निराशा होत असते. तरी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे कृषी विभागाने सर्वेक्षण करुन योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी चेतन दहीकर, योगेश नाकाडे, सुशील गहाणे, विलास गायकवाड यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.