शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसाने नर्सरी व धानपिकांचे नुकसान

By admin | Updated: July 23, 2014 23:42 IST

सडक/अर्जुनी तालुक्यातील तलाठी साजा क्र.१३ अंतर्गत येणाऱ्या शेंडा येथील शेतकऱ्यांचे सततच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे धानपिक व नर्सरी पाण्याखाली आल्याने नुकसान झाले आहे.

शेंडा/कोयलारी : सडक/अर्जुनी तालुक्यातील तलाठी साजा क्र.१३ अंतर्गत येणाऱ्या शेंडा येथील शेतकऱ्यांचे सततच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे धानपिक व नर्सरी पाण्याखाली आल्याने नुकसान झाले आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे या परिसरात सतत पंधरा दिवसापासून पाऊस पडल्याने तलाव बोड्या ओव्हरफ्लो झाल्या. छोट्या छोट्या नाल्यांना पाण्याची थोप आहे. तलाव काठावरील धानपिक व नाल्यांना लागून असलेल्या शेतीतील धानपिक चार दिवसापासून पाण्याखाली दबून आहेत. त्यामुळे अगोदरच हवालदील झालेल्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे धानपिक नष्ट झाले आहे.छत्रपाल परतेकी, मनोज मरस्कोल्हे, भागवत पंधरे, प्रल्हाद पंधरे, बिरजलाल परतेकी, चिंताराम मडावी, सदाराम कोडापे, लालचंद गजभिये, सुरेंद्र वाढीवे, विजय बावनकुळे, रविंद्र बावनकुळे, राजेश चाचेरे, कांतीलाल मेश्राम व राजकुमार दहिवले या शेतकऱ्यांचे धानपिकाचे कमी अधिक प्रमाणात लाखो रुपयाचे धानपिक नष्ट झाले आहे.पावसाचा कहर होत आहे. अगोदरच कर्जबाजारी शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचे सावट त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गाव खेड्यातील शेतकरी आपल्या संपूर्ण कुटुंबासह शेतीत राबतो. त्याचप्रमाणे या परिसरात उद्योगधंदे नसल्याने शेतीवर अवलंबून राहून आपला उदरनिर्वाह करतो. बँकेकडून घेतलेले कर्ज व इतरांकडून घेतलेल्या उसनवारीची परतफेड कशी करावी. या विचाराने शेतकरी, चिंतातूर झाला आहे. कृषी विभागातील कर्मचारी व महसूल विभागातील तलाठ्याला शेतीची पाहणी करण्यासाठी वारंवार सुचना देऊनही वेळेवर येत नाही. तर तलाठी कार्यालयाच्या चकरा मारुनही तलाठी कार्यालयात हजर मिळत नाही. अशातच विलंब होऊन शेतकऱ्यांकडे कानाडोळा केला जातो, असा सूर शेतकऱ्यांकरवी निघत आहे.प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी एसीत बसून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेतात काय? असा सवालही शेतकरी करीत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्यात यावी व उदरनिर्वाहासाठी काम देण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पावसाळ्याचा दिड महिना लोटल्याने शेतकऱ्यांच्या पहिल्या पेरण्या मृत्यू पावल्या. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. दुबार पेरणी केल्यावर संततधार पावसाने उसंत न दिल्यामुळे टाकलेला धान वाहून गेला. ज्या शेतकऱ्यांनी जेमतेम रोवणी केली त्या शेतकऱ्यजांची रोवणी पाण्यामुळे वाहून गेली. (वार्ताहर)