शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 20:41 IST

तिरोडा तालुक्यात शुक्रवारी (दि.१३) रात्री आलेल्या वादळी पावसामुळे फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून फळबागधारकांना रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : नुकसान भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : तिरोडा तालुक्यात शुक्रवारी (दि.१३) रात्री आलेल्या वादळी पावसामुळे फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून फळबागधारकांना रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे.शुक्रवारी रात्री वडेगाव परिसरात वादळी वाºयासह पावसाला सुरूवात झाली. वादळामुळे आंबा तसेच इतर फळांच्या बांगाना मोठा फटका बसला. वादळामुळे फळांची पडझड झाल्याने शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास हिरावला गेला. साटोना येथील भोजराज पटले यांच्या गट क्र . ४५१ वरील बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांच्या दोन एकर शेतीतील बागायती शेतीत ६६ आंब्याची,चिकू, संत्रा व इतर पिके मिळून सुमारे ४६७ फळझाडे लावलेली आहेत.आंब्याचे पीक ऐन जोमात येत असतानाच चक्र ीवादळामुळे सर्व आंबे तुटून पडले. यात पटले यांचे सुमारे ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले. अनेक झाडे मुळापासुनच कोलमडून पडली. यामुळे शेतकºयावर संकट ओढावले आहे. स्थनिक तलाठीे, कृषी सहायक प्रमोद डोहाळे यांनी फळबागांना भेट देऊन पंचनामा केला. तसेच याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला. याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देऊन शासनाकडून मदत मिळण्यास पाठपुरावा करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी भोजराम पटले यांनी केली आहे.परिसरात फळबागांची लागवड करून पीक घेणारे मोजकेच शेतकरी असल्याने या भागात फळबागांचा विमा काढत नाही.यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते.- भोजराम पटले, नुकसानग्रस्त शेतकरी, वडेगाव.

टॅग्स :Farmerशेतकरी