शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कीडरोगांमुळे ४९ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 22:12 IST

यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने ७० हजारांवर हेक्टर क्षेत्र पडीक राहिले.

ठळक मुद्देउत्पादनात होणार घट : तीन तालुक्यांना सर्वाधिक फटका, कृषी विभागाने पाठविला अहवाल

देवानंद शहारे।आॅनलाईन लोकमतगोंदिया : यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने ७० हजारांवर हेक्टर क्षेत्र पडीक राहिले. तर काही शेतकऱ्यांनी कशी बशी रोवणी केली, पण धानपिकांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला. यामुळे जिल्ह्यातील ४९ हजार हेक्टरमधील धानपिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने सोमवारी (दि.२०) जिल्हाधिकाºयांना पाठविला आहे.यावर्षी सुरूवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे अनेकांची रोवणी होवू शकली नाही. काही शेतकऱ्यांचे पºहेसुद्धा करपले. नुकसानीत भरीस भर म्हणून कीडरोगांनी पिकांवर आक्रमण केले. धान पिकांवरील तुडतुड्यांमुळे बाधित क्षेत्राचे जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात आले. यात ४८ हजार ९६९.५३ हेक्टरातील धानपीक प्रभावित झाल्याचे आढळले. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्यात १ लाख ७८ हजार २२९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र पेरणीखाली आहे. पावसाच्या अभावाने यावर्षी केवळ १ लाख ४३१०२ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या अहवालात नमूद आहे. त्यातच ४८ हजार ९६९.५३ हेक्टरमधील पीक तुडतुड्यामुळे बाधित झाले आहे. केवळ ९४१३२.६७ हेक्टरमधील पीक तुडतुड्याच्या प्रादुर्भाव नसल्याचे कृषी विभागाचे म्हटले आहे.पावसाचा अभाव, रोवणी न होणे, पºहे करपणे, त्यानंतर रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पन्नच होणार नसल्याने अनेक शेतकºयांनी शेतातील उभे पीक जाळून टाकल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात तुडतुड्यामुळे ३३ टक्केपेक्षा कमी प्रादुर्भावाचे क्षेत्र २४ हजार २१०.६६ हेक्टर आहे. तर ३३ टक्केपेक्षा जास्त प्रादुर्भावाचे क्षेत्र २४ हजार ७५८.८७ हेक्टर आहे. असे ४८ हजार ९६९.५३ हेक्टर क्षेत्र तुडतुड्यामुळे बाधित झाले आहे. त्यातही देवरी, गोंदिया व तिरोडा तालुक्यातील धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.