शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

एटीव्हीएमद्वारे दररोज २० हजारांची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 01:27 IST

तिकीट काऊंटरसमोर प्रवाशांच्या लागणाऱ्या लांबच लांब रांगा बघून गोंदिया रेल्वे स्थानकावर स्वयंचलित तिकीट व्हेंडिंग

स्मार्ट कार्डद्वारे तिकीट : लवकरच लागणार क्वॉईन व्हेंडर मशीनगोंदिया : तिकीट काऊंटरसमोर प्रवाशांच्या लागणाऱ्या लांबच लांब रांगा बघून गोंदिया रेल्वे स्थानकावर स्वयंचलित तिकीट व्हेंडिंग मशीन्स (एटीव्हीएम) लावण्याची मागणी होती. त्यासाठी एकूण आठ मशीन्स प्रस्तावित होत्या. यापैकी सध्या दोन मशिन्स उपलब्ध झाल्या असून त्यांना प्लॅटफॉर्म-१ वर लावण्यात आले. या दोन मशिन्सच्या माध्यमातून दरदिवशी २० हजार रूपयांची आवक होत असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.गोंदिया स्थानकावर सुविधा प्रदान करण्यासाठी नागपूर रेल्वे मंडळाद्वारे १४ जुलै रोजी एटीव्हीएम सुविधेचा शुभारंभ खा.नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आ.गोपालदास अग्रवाल, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूरचे मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल, वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल, प्रमुख अधिकारी व रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळ प्रवाशांना नवनवीन सुविधा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच गोंदिया स्थानकावर दोन एटीव्हीएमच्या सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांचा विस्तार लवकरच राजनांदगाव, डोंगरगड, आमगाव, बालाघाट, तिरोडा, तुमसर रोड, भंडारा रोड, कामठी, इतवारी, छिंदवाडा व वडसा स्थानकावरही करण्यात येणार आहे. प्रवाशांना त्वरित तिकीट मिळविण्यासाठी या मशीन्स सार्थक ठरतील. गोंदिया रेल्वे स्थानकातून चारही दिशांना रेल्वेगाड्या धावतात. दरदिवशी २० हजार प्रवाशी रेल्वे गाड्यांत चढतात व एवढेच प्रवाशी येथे उतरतात. तिकीट घेणाऱ्यांची काऊंटरसमोर लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे अनेकांच्या गाड्या सुटून दुसऱ्या गाडीच्या प्रतीक्षेत त्यांना राहावे लागत होते. मात्र आता या मशीन्स लागल्याने तिकीट काऊंटरसमोर लागणाऱ्या प्रवाशांच्या रांगापासून मुक्ती मिळणार आहे. लोकमतने सातत्याने या मशीन्सबाबत पाठपुरावा केला होता हे विशेष.गोंदिया रेल्वे स्थानकावर लागलेल्या दोन्ही मशीन्स स्मार्ट कार्डद्वारे संचालित होणाऱ्या आहेत. मात्र आता आणखी एक आॅटोमेटिक तिकीट व्हेंडींग मशीन्स गोंदिया स्थानकाला उपलब्ध झाली आहे. ही नवीन मशीन स्मार्ट कार्डद्वारे नव्हे तर सिक्क्यांद्वारे संचालित होणार आहे. त्यामुळे तिला आॅटोमेटिक तिकीट कॉईन व्हेंडींग मशीन म्हटले जाते. ही मशीन रेलटोली भागाकडील रेल्वे स्थानकातील तिकीट बुकींग कार्यालयात लागणार आहे. प्रस्तावित आठ मशीन्सपैकी तीन मशीन्स स्थानकाला उपलब्ध झाल्या असून पाच मशीन्स आणखी मिळणार आहेत. त्यामुळे तिकीट काऊंटरवरील गर्दी कमी होईल. (प्रतिनिधी)७० रुपयांत स्मार्ट कार्ड४गोंदिया स्थानकात स्मार्ट कार्ड व त्याला रिचार्ज करण्याची सुविधा बुकिंग आॅफिसच्या काऊंटर क्रमांक ७ मध्ये उपलब्ध आहे. स्मार्ट कार्ड ७० रूपये शुल्क भरून प्राप्त केले जावू शकते. यात ५० रूपये सिक्युरिटी डिपॉझिट व २० रूपयांचा रिचार्ज मिळतो. त्यानंतर केव्हाही २० ते नऊ हजार ५०० रूपयांपर्यंतच्या रकमेचा टापअप केले जावू शकते. एटीव्हीएम स्मार्ट कार्डच्या प्रत्येक रिचार्जवर पाच टक्के बोनस मिळते. तसेच स्मार्ट कार्डची वैधता अंतिम रिचार्जच्या तारखेपासून एका वर्षाची राहणार आहे.