शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखू विक्रीवर बंदी असलेले पहिले गाव होणार दाभना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:46 IST

कर्करोगाला आमंत्रण देणाऱ्या तंबाखूला पायबंद घालण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील दाभना हे गाव पुढे आले आहे. गावातील जनता निरोगी राहावी व संस्कारक्षम विद्यार्थी घडावेत यासाठी दाभना गावाने तंबाखू विक्री बंदी गावाचा ठराव घेतला आहे.

ठळक मुद्दे१५ तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई : गावकऱ्यांनी घेतला तंबाखूमुक्त गावाचा ठराव

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कर्करोगाला आमंत्रण देणाऱ्या तंबाखूला पायबंद घालण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील दाभना हे गाव पुढे आले आहे. गावातील जनता निरोगी राहावी व संस्कारक्षम विद्यार्थी घडावेत यासाठी दाभना गावाने तंबाखू विक्री बंदी गावाचा ठराव घेतला आहे. गावात तंबाखू विक्री होणार नाही असा संकल्प करण्यात आला आहे.तंबाखू नियंत्रण पथक जिल्हा व तालुका पथकाकडून करण्यात येणाºया कारवाईमुळे प्रभावित होऊन अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील दाभना ग्रामपंचायतीने तंबाखूमुक्त गाव करण्याचा ठराव घेतला आहे. गावातील विद्यार्थी व तयार होणारी पिढी संस्कारक्षम व्हावी या उद्देशातून गाव तंबाखूमुक्त करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला.जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अमरीश मोहबे, अर्जुनी-मोरगावचे पोलीस निरीक्षक कुंभरे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा व तालुका तंबाखू नियंत्रण पथकाने अर्जुनी-मोरगाव तालुक्यात तंबाखू विक्री करणाºया १५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.५ फेब्रुवारीला करण्यात आलेल्या कारवाई करणाऱ्या पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर बुराडे, पोलीस हवालदार प्रमोद चव्हाण, झामेश गायकवाड, विलास कारेवार, जिल्हा सल्लागार डॉ.शैलेश कुुकडे, सुरेखा आझाद, एन.मेश्राम व संध्या शंभरकर यांचा समावेश होता.विक्रेत्यांवर असा आहे दंडसार्वजनिक क्षेत्रात धुम्रपान करण्यास बंदी आहे. धुम्रपान करताना आढळल्यास २०० रूपये दंड, कलम ५ नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहीरात करण्यावर बंदी आहे. ते करताना आढळल्यास २ वर्षापर्यंत शिक्षा किंवा एक हजार रूपये दंड, दुसºयांदा गुन्हा केल्यास ५ वर्षापर्यंत शिक्षा किंवा पाच हजार रूपये दंड आहे.विक्रेत्यांचे फलकच गायब१८ वर्षाखालील बालकांना तंबाखू विक्री करणे कायद्याने दंडनिय अपराध आहे. तंबाखू विक्रेत्यांनी १८ वर्षाखालील व्यक्तीस तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे हा दंडनिय अपराध आहे. असे फलक विक्रेत्यांनी दुकानासमोर लावणे बंधकारक आहे. तो फलक न लावणाऱ्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांना २०० रूपये दंड आहे. गोंदिया जिल्ह्यात हे फलक दिसतच नाहीत. कलम ६ (ब) नुसार शैक्षणीक संस्थाच्या तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी आहे. आढळल्यास २०० रूपये दंड करता येते.खुली तंबाखू व खर्रा विक्रीमुळे उल्लंघनकलम ७ नुसार तंबाखूच्या वेस्टनावर धोक्याची सूचना देणे बंधनकारक आहे. खुल्या तंबाखू व खर्रा यावर कोणत्याच प्रकारची सूचना नसते.त्यामुळे कलम ७ चे उल्लंघन होते. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खर्रा विक्री केला जात आहे. तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ उत्पादकाचा पहिला गुन्हा असेल तर त्याला २ वर्षापर्यंत शिक्षा किंवा ५ हजार रूपये दंड, विक्रेत्याचा पहिला गुन्हा असेल तर १ वर्षापर्यंत शिक्षा किंवा ५ हजार रूपये दंड अशी माहिती विक्रेत्यांना देण्यात आली.