शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी सिनेस्टारचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 21:05 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेबाबत शहरवासीयांत जनजागृती करण्यासाठी हिंदी चित्रपट सृष्टीतले स्टार अमिताभ बच्चन व शिल्पा शेट्टी गोंदियात आले आहेत. यासाठी नगर परिषदेने शहरात ठिकठिकाणी होर्डींग्स लावले असून या स्टार्सच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशन : नगर परिषदेने लावले शहरात होंर्डिंग्स

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेबाबत शहरवासीयांत जनजागृती करण्यासाठी हिंदी चित्रपट सृष्टीतले स्टार अमिताभ बच्चन व शिल्पा शेट्टी गोंदियात आले आहेत. यासाठी नगर परिषदेने शहरात ठिकठिकाणी होर्डींग्स लावले असून या स्टार्सच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे.आपले शहर स्वच्छ व सुदर असावे यासाठी शासनाकडून स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. यांतर्गत शासनाकडून विविध प्रकारचे उपक्रम घेतले जात असून लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे. यासाठी रॅली, पथनाट्य, कार्यक्रम आदिंचे आयोजन केले जात आहे. लोकांना आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जागरूक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे होत असतानाच सिनेस्टार्सच्या अदांची कॉपी करणे व त्यांनी काही सांगीतल्यास त्याचे अनुकरण करणारेही त्यांचे कित्येक चाहते आहेत. यासाठीच आता जनजागृतीच्या या कामासाठी सिने व क्रिकेट स्टारचा वापर केला जात आहे. असाच प्रयोग गोंदिया नगर परिषदेने केला आहे. शहरवासीयांत स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी. यासाठी नगर परिषदेच्या स्वछता विभागाने सिनेस्टार अमिताभ बच्चन व शिल्पा शेट्टी तसेच क्रिकेटस्टार सुरेश रैना यांचे होर्डिग्स शहरात ठिकठिकाणी लावले आहेत. या होर्डिंग्सच्या माध्यमातून शहरवासीयांना ओला व सुका कचºयाचे व्यवस्थापन तसेच शौचालय बांधकाम व शौचालयांचा वापर याबाबत संदेश दिला जात आहे. शहरात सध्या हे होर्डिंग्स आकर्षणाचे केंद्र बनले असून प्रत्येकच भागात हे होर्डिंग्स दिसून येत आहेत.समितीला खुश करण्याचा प्रयत्नस्वच्छता तसेच शौचालय बांधकाम व त्यांचा वापर करण्याचा संदेश देणारे हे होंर्डिंग्स लावून नगर परिषद आपले काम दाखविण्यासाठी धडपड करीत आहे. विशेष म्हणजे, ९ व १० तारखेला राज्यस्तरीय समिती सर्वेक्षणासाठी आली होती. तेव्हा त्यांना खुश करण्यासाठी स्वच्छता विभागाने हे होर्डिंग्स लावल्याचे आढळले. समिती सर्वेक्षणासाठी येणार असल्याने त्यांना स्वच्छता विभागाकडून किती तत्परतेने काम केले जात आहे हे दाखविण्यासाठी ही सर्व धडपड दिसून आली.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान