शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात दरवाढीच्या निषेधार्थ प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 14:06 IST

खा. पटेल यांनी  गोंदियात गांधी प्रतिमा ते उपविभागीय कार्यालयापर्यंत सायकल चालवून पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविला.

ठळक मुद्देपेट्रोल दरवाढीचा निषेध उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे महागाईमध्ये वाढ होत असून त्याचा फटका गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. या दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी (दि.२५) दुपारी १२.३० वाजता स्थानिक गांधी प्रतिमा चौकातून खा. प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्त्वात सायकल रॅली काढण्यात आली. खा. पटेल यांनी गांधी प्रतिमा ते उपविभागीय कार्यालयापर्यंत सायकल चालवून पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविला. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन रॅलीला सुरूवात झाली. त्यानंतर ही सायकल रॅली आंबेडकर चौकात पोहचली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला खा.पटेल यांनी माल्यार्पण केले. त्यानंतर सिव्हिल लाईन परिसरातील उपविभागीय कार्यालयाजवळ सायकल रॅली पोहचली. खा. पटेल हे स्वत: सायकल चालवित रॅलीत सहभागी झाल्याने या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. रॅलीत माजी. आ. राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, माजी. आ. दिलीप बन्सोड यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले.

 

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलPetrolपेट्रोल