शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनालाच दिली पसंती

By admin | Updated: May 17, 2014 23:43 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची लाट नसल्याचे सत्ता पक्षातील नेत्यांचे दावे भाजपच्या दणदणीत विजयानंतर सपेशल फोल ठरले.

गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची लाट नसल्याचे सत्ता पक्षातील नेत्यांचे दावे भाजपच्या दणदणीत विजयानंतर सपेशल फोल ठरले. या मतदारसंघात मतदारांनी मोटी लाटेवरच शिक्कामोर्तब करुन देशाच्या सत्ता परिवर्तानात आपला वाटा मजबुत केला. या मतदारसंघातील तुमसर, भंडारा, साकोली, अर्जुनी, तिरोडा, गोंदिया या सहाही विधानसभा क्षेत्रात मोदी लाट दिसून आली. राकाँचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव अनपेक्षित नाही, परंतु नाना पटोलेंनी घेतलेली आघाडी मात्र नक्कीच अनपेक्षित आहे. विजयाचा हा फरक दीड लाखाच्या घरात राहील, हे अपेक्षित नव्हते. खर्‍या अर्थाने हा पटेलांचा पराभव नसून मोदी लाटेचा विजय आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. यावेळेच्या निवडणुकीत नवमतदार ‘अ‍ॅग्रेसिव्ह’ होते. नवमतदारांसाठी बेरोजगारीचा मुद्दा होता. सामान्य नागरिकांना महागाईने त्रस्त केले होते. भ्रष्टाचाराचा मुद्दा आघाडीवर होता. त्यातच नाना पटोले यांनी २०१४ ची लोकसभा पराभूत झाल्यानंतर जोमाने कामाला लागले होते. एक दिवस प्रफुल पटेल यांना पराभूत करेन, असा निर्धार केला होता. आणि हा निर्धार त्यांनी एका पत्रपरिषदेत बोलून दाखविला होता. तो निर्धार शुक्रवारच्या विजयाने पूर्ण झाला. पूर्वी एका विधानसभेपुरते असलेले काम आता सहा विधानसभेपर्यंत वाढले आहे. त्यामुळे जनतेने सोपविलेली जबाबदारी नाना पटोले यांना पार पाडायची आहे. राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षाबद्दलची तळमळ कमी आणि स्वार्थभाव अधिक असल्यामुळे ते मतदारांपर्यंत कसे पोहोचले, याबद्दल शंकेचे वातावरण आहे. त्यातच पटेल यांच्याभोवती वावरणार्‍या चौकडीविषयी सामान्य कार्यकर्त्यांची नाराजी यावेळी लपून राहिली नाही. विशेष म्हणजे सहापैकी दोन काँग्रेस आमदारांच्या क्षेत्रातही पटेलांना मताधिक्य घेता आले नाही, ही त्या क्षेत्रासाठी धोक्याची घंटा ठरणारी आहे. (जिल्हा प्रतिनिधी)